नंदुरबार:  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सूडाची भाषा करतात हे दुर्दैव आहे. मात्र तुम्ही कितीही धमक्या दिल्या, तरी आम्ही घाबरणार नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.


नंदुरबार इथं ऊस-कापूस उत्पादक शेतकरी परिषदेत त्या बोलत होत्या.

विरोधकांचं नाक दाबण्याच्या अनेक कुंडल्या आमच्या हातात आहेत, योग्य अस्त्र योग्य वेळी बाहेर काढू, असा गर्भित इशारा कालच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. त्याला सुप्रिया सुळेंनी आज उत्तर दिलं.

यावेळी सुप्रिया म्हणाल्या, "महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुडाची भाषा करतात हे दुर्दैव आहे. तुम्ही आम्हाला कितीही धमक्या द्या, आम्ही घाबरणार नाही".

"शेतकरी आत्महत्येप्रकरणी सरकारवरच आता ३०२ अर्थात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची गरज आहे. कापसाला प्रतिक्विंटल १० हजारांचा हमी भाव द्या. ऊसाला तीन हजार आणि कांद्याला दोन हजार पाचशेचा भाव द्या", अशी मागणीही सुप्रिया सुळेंनी केली.

विरोधकांचं नाक दाबण्याच्या अनेक कुंडल्या हाती : मुख्यमंत्री 


विरोधकांचं नाक दाबण्याच्या अनेक कुंडल्या आमच्या हातात आहेत, योग्य अस्त्र योग्य वेळी बाहेर काढू, असा गर्भित इशारा कालच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.

मुंबईत भाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक सुरु आहे. त्यामध्ये कार्यकर्त्यांसमोर बोलताना मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना सुनावलं. ‘विरोधकांचं नाक दाबण्याच्या अनेक कुंडल्या आमच्या हातात आहेत, आम्ही अस्त्रं सांभाळून ठेवली आहेत. योग्य वेळी योग्य ते अस्त्र बाहेर काढू’ असं फडणवीस म्हणाले.

संबंधित बातम्या


सुप्रियाताई स्वपक्षालाच सुळावर का चढवता?: आशिष शेलार 


कोपर्डीप्रकरणी दोन दिवसात चार्जशीट दाखल करा, अन्यथा....


नळावरच्या बायकांप्रमाणे मुख्यमंत्री वसावसा भांडतात : सुप्रिया सुळे