पुणे : अॅट्रॉसिटी कायद्याच्या समर्थनार्थ आज विविध दलित संघटनांनी आज शरद पवारांच्या बारामतीत मोर्चा काढला. अॅट्रॉसिटी संघर्ष मूक मोर्चात मोठ्या प्रमाणावर लोकांनी गर्दी केली. विशेष म्हणजे या मोर्चात महिलांची उपस्थिती लक्षणीय आहे.

अॅट्रॉसिटी कायदा मजबूत व्हावा, त्यासाठी विशेष न्यायालयाची स्थापना करावी. यासह मुस्लीम, मराठा, धनगरांना आरक्षण मिळावं, या मागण्या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आल्या आहे.

तसंच कोपर्डीसह देशभरातील बलात्कार प्रकरणामधील दोषींना त्वरीत फाशी देण्याची मागणीही या मोर्चात करण्यात आली.