मुंबई खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule)  यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला (OM Birla)  यांना पत्र लिहिले आहे. खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare)  यांचे तात्काळ निलंबन करा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

  परिशिष्ट दहा नुसार पक्षविरोधी कृती केल्याने सुनील तटकरे यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी पत्राच्या माध्यमातून सुप्रिया सुळेंनी लोकसभा अध्यक्षांना विनंती केली आहे.  






चार महिने उलटून देखील कोणतीही कारवाई न झाल्याने सुप्रिया सुळे यांनी पत्राच्या माध्यमातून खंत व्यक्त केली. कारवाई होत नसल्याने परिशिष्ट दहाचे उल्लंघन होत असल्याची बाब सुप्रिया सुळेंकडून नमूद करण्यात आली आहे.


जुलै महिन्यात केली होती याचिका


 खासदार सुनील तटकरे यांना अपात्र करण्यासाठी आम्ही 4 जुलैला याचिका दाखल केली होती. मात्र, आजपर्यंत त्यावर कुठलीही करावी केली गेली नाही. त्यामुळे लवकरात लवकर निर्णय घ्या, अशी विनंती खासदार सुप्रिया सुळे यांनी ओम बिर्ला (Supriya Sule Request To Om Birla)  यांच्याकडे केली आहे.


याचिकेत काय म्हणाल्या होत्या सुप्रिया सुळे?


पक्षाच्या या दोन खासदारांनी राष्ट्रवादी पक्षाची विचारसरणी बाजूला सारले आहे.  स्वतःच्या राजकीय महत्त्वाकांक्षा साध्य करण्यासाठी या नेत्यांनी पक्षविरोधी कारवाई केली आहे. तसेच राष्ट्रवादीला देण्यात आलेल्या मतांना त्यांनी न जुमानता मतदारांचाही विश्वासघात केला आहे.  त्यामुळे राज्यघटनेच्या 10 व्या परिशिष्टानुसार, पक्षांतरबंदी कायद्यांच्या अंतर्गत या नेत्यांवर तात्काळ अपात्रतेची कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली होती.  


जुलै महिन्यात राष्ट्रवादीत उभी फूट पडली


 राज्याच्या राजकरणात मोठा राजकीय भूकंप आला आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. राष्ट्रवादीमध्ये फूट पडली आहे. अजिप पवारांसोबत राष्ट्रवादीचा एक गट शिंदे-फडणवीस सरकारसोबत सामील झाला . राष्ट्रवादीचे  आमदारचं अजित पवारांच्यासोबत गेले .


हे ही वाचा :


Sunetra Pawar: सुनेत्रा पवार राजकारणात सक्रिय होणार का? मोळीपूजन कारखान्याचे, चर्चा लोकसभेच्या