मुंबई : ऐन दिवाळीच्या (Diwali 2023) तोंडावर प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. एसटीच्या सर्व (ST Mahamandal)  आगारातून वाहतूक सुरळीत झाल्या आहेत. मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान (Maratha Reservation Protest) अनेक ठिकाणी एसटी बसला लक्ष्य करण्यात आलं होतं. त्यामुळे खबरदारी म्हणून अनेक एसटी फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या. आता राज्यभरात शालेय विद्यार्थ्यांच्या सहामाही परीक्षा सुरु असल्याने शालेय फेऱ्यांना एसटीकडून प्राधान्य देण्यात आलंय. येत्या 9 नोव्हेंबरपासून एसटीची दिवाळी जादा वाहतूक सुरु होणार आहे.


सणासुदीला गर्दीचा फायदा घेत खासगी बसचालक प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा भाडे उकळले जाते.दिवाळीमध्ये बसेसअभावी प्रवाशांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही एसटीच्या बसेस सोडण्यात येणार आहेत. विविध मार्गांवर या बसेस धावणार असून जादा बसेस 9 नोव्हेंबरपासून सुटणार आहेत. 


दिवाळीच्या सुट्टीत महाविद्यालये व शाळांना सुट्टी


एसटी महामंडळाच्यावतीने होळी, गणेशोत्सव, दसरा-दिवाळी आदी सण-उत्सवाच्या काळात जादा वाहतूक चालवली जाते. या दरम्यान, एसटीला अधिक उत्पन्न मिळवण्याची संधी असते. दिवाळीच्या सुट्टीत महाविद्यालये व शाळांना सुट्टी असते. त्यामुळे अनेक कुटुंबे मुलांसह गावी, धार्मिक स्थळे किंवा पर्यटनस्थळांना भेटी देण्याचे नियोजन करतात. तर नोकरीनिमित्त बाहेर असणारे कर्मचारीही या सणात आपल्या घरी जात असतात. अशावेळी हे सर्व प्रवाशी एसटीला प्राधान्य देतात.  तसेच मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान अनेक ठिकाणी एसटी बसला लक्ष्य करण्यात आलं होतं. ते नुकसान भरून काढण्याचा प्रयत्न असणार आहे.


बुलढाण्यात 76 बस फेऱ्यांची सेवा आजपासून पूर्ववत 


बुलढाणा जिल्ह्यातून मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रात जाणाऱ्या 76 बस फेऱ्यांची सेवा आजपासून पूर्ववत करण्यात आली आहे. मराठा आंदोलनाच्या पार्श्वभुमीवर गेल्या चार दिवसांपासून मराठवाड्यात जाणाऱ्या बस बंद करण्यात आल्या होत्या.  


प्रवाशांचे हाल 


मराठा आरक्षणावरून होत असलेल्या हिंसक आंदोलानानंतर आता एसटी बस सेवा बंद करण्यात आली आहे. दरम्यान याचा फटका प्रवाशांना बसला. विशेष म्हणजे सणासुदीचा काळ असल्याने अनेकजण जण गावाकडे जात असतात. मात्र, बसच बंद असल्याने गावाकडे कसे जावं असा प्रश्न प्रवाशांना बसत होता. तर खाजगी वाहन धारकांकडून अधिक पैसे घेतले जात असल्याने प्रवाशांना याच आर्थिक फटका बसत होता.  विविध मार्गांवर या बसेस धावणार असून जादा बसेस 9 नोव्हेंबरपासून सुटणार आहेत. 


हे ही वाचा :