Supriya Sule On Badlapur School Crime News : बदलापूर (Badlapur) येथील दोन चिमूरडींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ राज्यात तीव्र उद्रेक उमटताना  दिसून आले आहे.  बदलापूरमध्ये (Badlapur School Crime) या घटनेला हिंसक वळण लागले असून पंत जमावाने रेल्वे स्टेशनवर दगडफेकीच्या घटना देखील घडल्या आहेत. दुसरीकडे या घटनेचे पडसाद राज्याच्या राजकारणातून देखील उमटताना दिसत आहे. लाडक्या बहिणींसाठी पंधराशे रुपयांची योजना आणणाऱ्या सरकारने प्रथम राज्यातील महिलांना सुरक्षा प्रदान करावी. जर राज्यातील लेखींना सुरक्षा देता येत नसेल तर सरकारने राजीनामा द्यावा, अशी आग्रही मागणी  राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केली आहे.


बदलापूर येथे घडलेली घटना अतिशय दुःखद आणि दुर्दैवी असून  माझी सर्व समाज माध्यमांना आणि नागरिकांना विनंती आहे की  या प्रकरणातील पिढीत कुटुंबाची ओळख आणि गुप्तता कुठेही बाहेर जाता कामा नये. घटनेतील मुलगी अतिशय लहान वयाची असून तिचं उभा आयुष्य पुढे आहे. त्यामुळे या विषयात पुढे बोलताना आपण सर्वांनीच अतिशय संवेदनशील पणे बोलावे, असे आवाहन देखील सुप्रिया सुळे यांनी केले आहे. 


.... अन्यथा सरकारने जबाबदारी घेऊन राजीनामा दिला पाहिजे 


बदलापूर येथे घडलेली दुर्दैवी घटनेत सरकारने पुढे येऊन फास्टट्रॅक कोर्ट मध्ये एकदा तरी अशी शिक्षा व्हायला हवी की जेणेकरून अशी  घटना परत करण्याचे कोणाचे धाडस होणार नाही. अशा प्रकरणातील आरोपींना जेव्हा फाशीची शिक्षा होईल तेव्हाच असे घाणेरडे कृत्य करण्याआधी दहा वेळा नाही तर शंभर वेळा विचार करेल. कायद्याची जरूर अशा विकृत मनोवृत्तीच्या लोकांमध्ये बसली पाहिजे. साठी राज्याच्या गृहमंत्र्यांनी  जबाबदारी स्वीकारून योग्य ती कारवाई केली पाहिजे अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे. राज्याची पोलिस यंत्रणा एवढी सक्षम आणि कार्यक्षम आहे त्यावर मला व्यक्तींचीतही अविश्वास नाही. मात्र आज राज्यात क्राईम, अपघात, कोयता गॅंग सारख्या घटना राजरोस घडत आहेत. या पोलिसांचा सन्मान मी आदर्श पोलीस म्हणून होत असल्याचे अगदी बालपणापासून बघत आली आहे. आज देशातील सगळ्यात चांगले पोलीस म्हणून महाराष्ट्राच्या पोलिसांकडे बघितलं जातं.


मात्र या डिपार्टमेंट मध्ये अलीकडच्या काळात नेमकं काय बिघडलं आहे? या प्रश्नाचे उत्तर राज्याच्या गृहमंत्र्यांना द्यावंच लागेल.  राज्यातील महिलांना पंधराशे रुपये तुम्ही देत आहात त्याचे मी मनापासून स्वागत करते. मात्र त्यासोबतच महिलांना सुरक्षा देखील दिली पाहिजे. पण राज्यातील लेकींना सुरक्षा देता येत नसेल तर सरकारने जबाबदारी घेऊन राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी ही सुप्रिया सुळे यांनी केली.


अजीत पवार यांचा रक्षा बंधनासाठी फोन आला होता का?


अजीत पवार यांचा रक्षा बंधनासाठी फोन आला होता का? असा प्रश्न सुप्रिया सुळे यांना विचारला असता त्या म्हणाल्या की, अजित पवारांना निवडणुकीपूर्वी फोन केले होते. व्हॉट्स अप मेसेज केले होते. मात्र त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद आला नाही. याचाच अर्थ त्यांना बोलायचं नाही, हे स्पष्ट होतं. त्यामुळें आपण कुणाला फोर्स थोडीच करू शकतो. असे म्हणत त्यांनी अधिक बोलणे टाळले आहे. 


आणखी वाचा


बदलापूरमध्ये आंदोलकांचं आग्यामोहोळ उठलं, स्टेशनवर तुफान दगडफेक, पोलिसांनी शाळेबाहेर अश्रुधुराची नळकांडी फोडली