चंद्रपूर : एकनाथ खडसे यांचे पक्ष सोडणे कार्यकर्ता म्हणून धक्कादायक असल्याची प्रतिक्रीया भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. त्यांनी पुनर्विचार करावा आणि गेलेच तर सुखी राहावे. यावेळी खडसेंनी राष्ट्रवाद जोपासणारा पक्ष ते राष्ट्रवादाचा बुरखा घालणाऱ्या पक्षात जाणे वेदनादायी, असेही मुनगंटीवार म्हणाले.
खूप दिवसांपासून नाराज असलेल्या एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम ठोकला आहे. खडसे यांच्या राजीनाम्यानंतर भाजपच्या अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकनाथ खडसे यांचे पक्ष सोडणे कार्यकर्ता म्हणून धक्कादायक असल्याचे सुधीर मुनगंटीवार म्हणाले. त्यांनी पुनर्विचार करावा आणि गेलेच तर सुखी राहावे, भाजप कुण्या एकाचा पक्ष नाही हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. त्यामुळे या घडामोडीवर चिंतन करण्याची गरज, भाजप विस्तारात खडसेंचे मोठे योगदान आहे. खडसेंनी राष्ट्रवाद जोपासणारा पक्ष ते राष्ट्रवादाचा बुरखा घालणाऱ्या पक्षात जाणे वेदनादायी असल्याचीही टीका त्यांनी केली. सत्ता नसताना त्यांनी कार्यकर्ता बांधून ठेवला आता त्यांचा धीर खचला याबद्दल आश्चर्य वाटत असल्याचे मतही त्यांनी नोंदवले.
खडसेंनी समाजोपयोगी विषय मार्गी लावावे, त्यांना शुभेच्छा : चंद्रकांत पाटील
खडसे शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार : जयंत पाटील
एकनाथ खडसे शुक्रवारी (23 ऑक्टोबर) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ही माहिती दिली. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत जयंत पाटील बोलत होते. मात्र, एकनाथ खडसे यांच्या या निर्णयामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे. जयंत पाटील म्हणाले की, "एकनाथ खडसे यांनी भाजप पक्ष सोडला असल्याची माहिती मला मिळाली आहे. शुक्रवारी दुपारी दोन वाजता एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील." यावेळी "एकनाथ खडसे यांच्यावर भाजपमध्ये अन्याय झाला," असंही ते म्हणाले.
'जीवन उद्ध्वस्त करण्याचा फडणवीसांकडून प्रयत्न', भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर एकनाथ खडसे भावूक
खडसेंनी समाजोपयोगी विषय मार्गी लावावे, त्यांना शुभेच्छा : चंद्रकांत पाटील
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील बोलताना म्हणाले की, 'काही वेळापूर्वीच एकनाथ खडसे यांचा भारतीय जनता पार्टीच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष या नात्याने माझ्यापर्यंत पोहोचला. त्यांचा राजीनामा हातात पडेपर्यंत मी आणि आम्ही सगळेच आशावादी होतो की, कितीही रागावले तरी खडसे हा निर्णय घेणार नाहीत. ते आमच्याशी बोलतील आणि यातून मार्ग काढून आम्ही पुढे जाऊ. पण शेवटी कोणतीही गोष्ट जी ठरलेली असते, ती आपण टाळू शकत नाही. त्यामुळे हे कटू सत्य आहे की, खडसेंनी पक्षाचा राजीनामा दिलेला आहे.'
ओ जानेवाले हो सके तो लौट के आना; एकनाथ खडसेंच्या राजीनाम्यावर सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया