मुंबई : एकनाथ खडसेंनी भाजपला रामराम ठोकला असून ते शुक्रवारी राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली. यासंदर्भात बोलताना खडसे कितीही रागावले तरी हा निर्णय घेणार नाही, याबाबत आम्ही सगळेच आशावादी होतो, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. तसेच ठरलेल्या गोष्टी आपण टाळू शकत नाही, त्यामुळे एकनाथ खडसेंनी राजीनामा देणं हे कटू सत्य असल्याचंही ते म्हणाले.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील बोलताना म्हणाले की, 'काही वेळापूर्वीच एकनाथ खडसे यांचा भारतीय जनता पार्टीच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष या नात्याने माझ्यापर्यंत पोहोचला. त्यांचा राजीनामा हातात पडेपर्यंत मी आणि आम्ही सगळेच आशावादी होतो की, कितीही रागावले तरी खडसे हा निर्णय घेणार नाहीत. ते आमच्याशी बोलतील आणि यातून मार्ग काढून आम्ही पुढे जाऊ. पण शेवटी कोणतीही गोष्ट जी ठरलेली असते, ती आपण टाळू शकत नाही. त्यामुळे हे कटू सत्य आहे की, खडसेंनी पक्षाचा राजीनामा दिलेला आहे.'
पाहा व्हिडीओ : एकनाथ खडसेंनी राजीनामा देणं हे कटू सत्य : चंद्रकांत पाटील
एकनाथ खडसेंना यांच्या निर्णयासाठी त्यांना शुभेच्छा देताना एकनाथ खडसे म्हणाले की, 'खडसेंनी पक्षात रहावं, त्यांनी आमचं नेतृत्त्व करावं हिच आमची इच्छा होती. त्यामुळे सातत्याने त्यासदंर्भात प्रयत्न झाले. पण सगळेच प्रयत्न यशस्वी होतात असं नाही. ज्या पक्षात आता खडसे चालले आहेत. त्या पक्षात त्यांनी चांगलं काम करावं, प्रामुख्याने समाजाला उपयोगी पडणारे अनेक विषय त्यांनी मार्गी लावावेत. यासाठी मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो.'
पुढे बोलताना ते म्हणाले की, 'खडसेंनी राजीनामा का दिला हे त्यांनाच विचारणं योग्य ठरेल. आमचं म्हणणं असं आहे की, त्यांनी राजीनामा देण्याची आवश्यकता नव्हती. कारण पक्षात त्यांचं एक स्थान आहे. त्यांचं म्हणणं त्यांनी त्यात्या वेळी माडंल आणि खडसेंनी ज्यांच्या संदर्भात आपलं म्हणंणं मांडलं आहे त्यांनीही ते वेळोवेळी खोडलं आहे. त्यामुळे ते म्हणाले, हे म्हणाले करण्यापेक्षा जे घडलं आहे, ती वस्तुस्थिती स्विकारून सर्वांना पुढे जावं लागले.'
पाहा व्हिडीओ : देवेंद्र फडणवीस यांनी माझं जीवन उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला : एकनाथ खडसे
'खडसेंवर अन्याय झाला का? झाला तर तो कायप्रकारचा झाला हे त्यांना विचारल्यानेच योग्य उत्तर मिळेल. खडसे ज्यांच्यावर आरोप करत आहेत, ते देवेंद्र फडणवीस यांनी एकदा दिल्लीमध्ये माध्यमांशी बोलताना सगळ्या मुद्द्यांचं स्पष्टीकरण दिलं आहे. मग ते बंगालचं दिलं आहे, दाऊदच्या बायकोचं दिलं आहे, भोसरीतील एमआयडीसीतील भूखंडाचं दिलं आहे. सर्व विषयांवर फडणवीसांनी आपलं म्हणणं मांडंल आहे. पण तरि ते आपले मुद्दे मांडत राहिले आहेत.' असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
जयंत पाटील यांचं ट्वीट रिट्वीट करण्याबाबत बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, 'खडसेंनी जे ट्वीट रिट्वीट केलं होतं. त्यासंदर्भात मी सकाळी त्यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी त्यांनी ते ट्वीट लगेच डिलीट केलं. त्यामुळे मी आशावादी होतो की, अजूनही दोर तुटलेला नाही. आपण एकत्र बोलून जे मुद्दे तुम्ही माडता त्यावर फडणवीस स्पष्टीकरण देतील. त्यातून मार्ग काढू आणि भविष्याकडे वाटचाल करू. पण आता या चर्चेत काही अर्थ नाही.'
महत्त्वाच्या बातम्या :
- एकनाथ खडसे शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार : जयंत पाटील
- 'खडसेंनी भाजप सोडणं धक्कादायक, पक्षासाठी चिंतनाची बाब', खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाने भाजप नेत्यांना धक्का
- राष्ट्रवादी प्रवेशानंतर एकनाथ खडसे लगेचच मंत्री होणार?
- एकनाथ खडसेंनी सोडली कमळाची साथ; राजकीय कारकिर्दीतील काही महत्त्वाचे टप्पे