मुंबई : बनावट जात वैधता प्रमाणपत्र सादर करून एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण करणाऱ्या डॉक्टर विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.  यात  मोठं रॅकेट कार्यरत असल्याचा पोलिसांना संशय आहे.  मुंबई क्राईम ब्रँच आणि नाशिक पोलिस यंच्या माध्य्मतुन संयुक्त तपास सुरु करण्यात आला आहे.  


बनावट कागदपत्रे सादर करून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले अनेक राजकारणी आजवर बघितले आहेत. कालांतराने त्यांच्यावर कारवाई झाली की पदाला ही मुकावे लगाल आहे. मात्र आता बनावट जात वैधता प्रमाणात सादर करून शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी ईसलाहुझामा अन्सारी या डॉक्टर विरोधात मुंबई क्राईम ब्रान्चने गुन्हा दाखल करून तो नाशिकच्या आडगाव पोलीस ठाण्यात वर्ग केला आहे. अनुसूचित जमातीसाठी राखीव असणाऱ्या जागेवर अन्सारी याने 2010 मध्ये डॉ.वसंतराव पवार महाविद्यालयात  प्रवेश घेतला. तडवी जातीचे प्रमाणपत्र जोडले.  2010 ते 2014 या काळात शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर  मोठ्या हॉस्पिटलमध्ये रुग्णसेवा ही सुरू केली. आतपर्यंत ही सेवा सुरु आहे.  या संदर्भात राज्य सरकारच्या  आरोग्य विभागाकडे तक्रार दाखल झाल्यानंतर मुंबई क्राईम ब्रान्चने तपास सुरू केला असता बनावट जात वैधता प्रमाणपत्र सादर केल्याचं निष्पन्न झाले आहे.


  ईसलाहुझामा याने सादर केलेल्या प्रमाण पत्रावरील क्रमांकचे नंदुरबार जिल्ह्यातीला इंद्र्चन सोनवणे याना निवडणूक लढविण्यासाठी प्रमाणपत्र देण्यात आले होते. ज्या समितीच्या माध्यमातून वैधता प्रमाणपत्र दिले जाते त्यांना अन्सारीबाबत काहीच माहिती नसल्याच मुंबई क्राईम ब्रान्चच्या तपासात निष्पन्न झालंय. त्यामुळे नाशिक पोलीस आणि मुंबई क्राईम ब्रान्चने धुळे नंदुरबारकडे मोर्चा वळविला आहे. नंदुरबार जिल्ह्यातून एजंटच्या माध्यमातून मोठं रॅकेट कार्यरत असल्याचा संशय आडगावचे पोलिस निरीक्षक इरफान शेख यांनी व्यक्त केला आहे. 


वसंतराव पवार महाविद्यालयात अन्सारीने शिक्षण घेतले. मात्र महाविद्यालयाने हात झटकले आहे. शासनाकडून आरक्षणाचा कोटा ठरविला जातो,  त्यानुसार विद्यार्थ्यांची  नाव ही दिली जातात.  सर्व  कागदपत्रांची पडताळणी शासन स्तरावरच केली जाते. त्यामुळे कोण काय प्रमाणपत्र सादर करतो याबाबत महाविद्यालयाचा सबंध नसतो, आता काही प्रमाणात  क्रॉस चेकिंगला सुरवात झाली. परंतु आता खोट प्रमाणपत्र सादर करून मिळविलेल्या पदवीचे काय करायचे हा मोठा प्रश्न आहे. शासन स्तरावर या बाबत अंतिम  निर्णय घेण्याची गरज वसंतराव पवार महाविद्यालयाच्या डीन डॉ मृणाल पाटील यानी व्यक्त केली.


या आधीही 2014 ते 2016 च्या दरम्यान बनावट प्रमाणपत्र सादर करून शासनाच्या सवलतीचा लाभ घेतल्याचं आणि खऱ्या लाभार्थ्यांवर अन्याय करत शासनाची फसवणूक केल्याचं निदर्शनास आले होते. मात्र त्यावर ठोस उपाययोजना केली नसल्यानं सरार्स प्रकार सुरू आहेत. यामागे मोठं रॅकेट कार्यरत असून याचे धागेदोरे धुळे नंदुरबारच्या दिशेने दिसत आहे त्यामुळे पोलीसांनी रॅकेटचा पर्दाफाश करण्याच्या दृष्टीने तपास सुरू केला आहे.