Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University News : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या (RTMNU) विभागांना एका वर्षापूर्वी स्वायत्तता देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार पदव्युत्तर विभागांच्या प्रथम वर्षांच्या (First Year) परीक्षेची जबाबदारी एमकेसीएलला MKCL देण्यात आली होती. या कंपनीच्या सेवा संपुष्टात आल्या असल्या तरी हे भूत नागपूर विद्यापीठाच्या मानगुटीवरुन उतरत नसून प्रथम सेमिस्टरच्या (First Semister) परीक्षा उलटून तिसरे सेमिस्टरची (Third Semister) परीक्षा झाली असली तरी विद्यार्थ्यांना गुणपत्रिका (Marksheet) मिळाल्या नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.


कुलगुरु डॉ. सुभाष चौधरी (Vice Chancellor Dr Subhash Chaudhari) यांनी पुन्हा एमकेसीएलला परीक्षेचे कंत्राट देण्याचे ठरवले. मात्र, कंपनी पाच महिन्यापासून प्रथम वर्षाचे निकाल लावण्यात अपयशी ठरले. दरम्यान 25 ऑगस्टला या संदर्भात ॲड. अभिजित वंजारी (Adv Abhijeet Wanjari) यांनी विधान परिषदेमध्ये याबाबत प्रश्‍न उपस्थित करत, त्याची चौकशी करण्याची मागणी केली. याशिवाय प्रविण दटके यांनीही एमकेसीएलला पैसे देण्यासाठी विद्यार्थ्यांचे शुल्क वाढवण्यात येत असल्याची बाब उपस्थित केली. 


त्यावर या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. त्यानंतर लगेच 28 ऑगस्ट रोजी विद्यापीठात झालेल्या बैठकीत मंत्र्यांनी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सुभाष चौधरी यांना कंपनीसोबतचा करार तात्काळ रद्द करण्याचे आदेश दिले होते. दरम्यान प्रथम वर्षाप्रमाणेच एमकेसीएलला विद्यापीठाच्या स्वायत्तता देण्यात आलेल्या विभागांचीही जबाबदारी देण्यात आली. मात्र, तीही जबाबदारी सांभाळण्यात एमकेसीएल सपेशल अपयशी ठरली. अजूनही विभागातील तिसरे सेमिस्टर संपले तरी विद्यार्थ्यांना पहिल्या सेमिस्टरच्या गुणपत्रिका मिळालेल्या नाहीत. त्यामुळे विद्यार्थी चिंतेत सापडले आहेत.


प्राध्यापकांसमोरही डोकेदुखी


विभागांना स्वायत्तता देताना, बहुतांश विभागांमध्ये प्राध्यापकांचा वानवा आहे. यूजीसीच्या मार्गदर्शक सूचनेनुसार स्वायत्तता प्रदान करताना पूर्ण वेळ प्राध्यापक आणि दहा टक्क्यांहून अधिक कंत्राटी पदे भरली नसावी. मात्र विद्यापीठाच्या सर्व विभागात केवळ 52 टक्केच पूर्णवेळ प्राध्यापकांची नियुक्ती आहे. त्यामुळे कंत्राटी प्राध्यापकांवर विभागांचा गाडा ओढण्याची वेळ आली आहे. त्यात स्वायत्तता मिळाल्याने प्राध्यापकांवर कामकाजाचा अतिरिक्त बोजा वाढला आहे.


रिक्तपदांमुळे प्राध्यापकांवरही ताण


राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात गेल्या अनेक वर्षांपासून प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे मोठ्या संख्येने रिक्त आहेत. विद्यापीठामध्ये 941 मंजूर पदांपैकी 373 पदे रिक्त आहेत. त्यात प्राध्यापकांची एकूण 465 मंजूर पदे आहेत. त्यापैकी केवळ 243 पदे भरण्यात आली आहेत. अद्यापही 222 पदे रिक्त आहेत. यात सहाय्यक प्राध्यापकांची सर्वात जास्त 68 तर सहयोगी प्राध्यापकांची 46 पदे रिक्त आहेत. याशिवाय इतर प्राध्यापकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे चार वर्षांपासून प्राध्यापकांची भरती पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे. काही विभागांना तर नियमित प्राध्यापकच नसल्याने त्याची धुरा प्रभारींच्या भरवशावर आहे. परिणामी प्राध्यापकांवर कामाचा प्रचंड ताण वाढला आहे.


ही बातमी देखील वाचा...


उपराजधानीत घरफोडी करणाऱ्यांचा हैदोस ; डिसेंबरपर्यंत 700 घरफोड्या


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI