पुणे : ऑक्टोबर महिन्यात अंतिम वर्षाच्या परिक्षा होणार आहेत. यासाठी बहुतांश विद्यापीठांनी परीक्षांचा आराखडा जाहीर केला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानेही एमसीक्यू पद्धतीने परिक्षा घेणार असल्याचं जाहीर केलं आहे. अंतिम वर्ष परीक्षेच्या आधी विद्यापीठानं क्वेशन बॅंक उपलब्ध करुन द्यावी अशी मागणी विद्यार्थी करत आहेत.


सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून ऑक्टोबर महिन्यांत अंतिम वर्षाची परिक्षा घेण्यात आहे. बॅकलॉग विषयांची परीक्षा 1 ते 9 ऑक्टोबर दरम्यान होईल आणि नियमित परीक्षा 10 ते 30 ऑक्टोबर दरम्यान होईल. या परीक्षा ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने बहुपर्यायी (एमसीक्यू) प्रश्नांच्या स्वरूपातील प्रश्नपत्रिकांच्या माध्यमातून घेण्यात येतील. परीक्षेआधी विद्यापिठाकडून दोन वेळा सराव परिक्षाही घेण्यात येणार आहे. पण पुस्तकांची अनुपलब्धता, नवीन असलेला एमसीक्यू पेपर पॅटर्न आणि परिक्षेसाठी कमी उरलेला कालावधी यामुळे अंतिम वर्ष परीक्षेच्या आधी विद्यापिठानं क्वेशन बॅंक उपलब्ध करुन द्यावी अशी मागणी विद्यार्थी करत आहेत.


‘लॉकडाऊनमुळे अभ्यासक्रमही पुर्णपणे शिकवून झालेला नाहीये त्यामुळे एमसीक्यू पॅटर्नची प्रश्नपत्रिका कशी सोडवणार’ असं समिक्षा महिंद्रवाल या विद्यार्थिनीने विचारलं. क्वेशन बॅंकमधून अभ्यास करुन अंतिम वर्षाची परिक्षा इतक्या कमी कालावधी देणं शक्य होईल असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे.


सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठातील अंतिम वर्षीच्या परिक्षेसंदर्भातली आकडेवारी




  • विद्यापीठातील 184 अभ्यासक्रमांची परिक्षा होणार आहे.

  • 184 अभ्यासक्रमांसाठी 3000 प्रश्नपत्रिका तयार कराव्या लागणार आहेत.

  • अंतिम वर्षाच्या एकूण 2 लाख 49 हजार 52 विद्यार्थ्यांपैकी 2 लाख 23 हजार 18 विद्यार्थ्यांनी परिक्षेसाठी अर्ज भरला आहे.

  • यातील 1 लाख 85 हजार 177 विद्यार्थी ऑनलाईन परीक्षा देणार आहेत

  • 60 प्रश्नांपैकी 50 प्रश्नांची अचूक उत्तरं ग्राह्य धरण्यात येतील

  • या परिक्षेमध्ये 40 टक्के सोपे, 40 टक्के मध्यम आणि 20 टक्के कठीण प्रश्न असतील


यासंदर्भात बोलताना महेश काकडे, संचालक- परिक्षा मुल्यमापन मंडळ (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) की, “आॅक्टोबरमध्ये होणाऱ्या नियमित आणि बॅकलॉग परीक्षांसाठी प्रश्नपत्रिका बनवण्याचं काम सध्या सुरु आहे. अंतिम परीक्षेच्या आधी आपण 2 वेळा सराव परीक्षा घेणार आहोत. या सराव परीक्षांकडे विद्यार्थ्यांनी गांभिर्याने बघावं. तरीही क्वेशन बॅंक विषयी विचारवनिमय सुरु आहे. अंतिम निर्णय झाल्यावर सुकाणू समिती ते जाहीर करेलच.”


अंतिम वर्षाच्या परिक्षेसंदर्भातील अनिश्चिततेमुळे विद्यार्थ्यांची झालेली अडचण समजण्यासारखे आहे. पण सध्याच्या काळात ही परीक्षा घेताना विद्यापीठ प्रशासनलाही अधिकची तयारी करावी लागतेय. यामुळे क्वेशन बॅंक मिळेलच या आशेवर विद्यार्थ्यांना विसंबून राहता येणार नाही असं चित्र आहे.


संबंधित बातम्या :



विद्यार्थ्यांना पूर्वीप्रमाणेच पदवीचे प्रमाणपत्र मिळणार त्यावर कोविड-19 चा उल्लेख राहणार नाही : उदय सामंत