मुंबई : राज्य सरकार कोरोना लसीकरण कॅम्प्समध्ये वॉक-इन परवानगी देण्यात आली आहे. लसीकरण प्रक्रिया संपूर्णपणे डिजिटल केलेली आहे. त्यामुळे बनावट लसी देणाऱ्या फसव्या व्यक्तींना आपण बळी पडू नये, यासाठी काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. कोविन अॅपवर स्लॉट बुक करा किंवा लस घेण्यासाठी एखाद्या कॅम्पमध्ये स्लॉट बुक न करता वॉक-इन जा. मात्र तेथे गेल्यानंतर फसवणूक होऊ नये यासाठी काही गोष्टींची काळजी घ्या.
वॉक-इन कोविड लस शिबिरात जाताना या 6 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा
1. वॉक इन लसीकरण कॅम्पमध्ये जाताना मोबाईल फोनसह आपले आधार कार्ड घेऊन जावे लागेल
जर आपण CoWin अॅपवर आधी नोंदणी न करता वॉक इन लसीकरणासाठी जात असाल तर आपल्याला आपले आधार कार्ड आणि सुरु असलेला मोबाईल फोन घेऊन जाणे आवश्यक आहे. आपल्याकडे स्मार्टफोन असणे आवश्यक नाही, परंतु ओटीपी आणि लस प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आपल्याकडे मोबाइल नंबरअसणे आवश्यक आहे.
2. लस नोंदणी वेरिफाय करण्यासाठी आपल्या मोबाइल नंबरवर चार अंकी ओटीपी क्रमांक येईल
वॉक-इन लस कॅम्पमध्ये स्वतःची नोंदणी केल्यानंतर आपल्या नोंदणीची पुष्टी करण्यासाठी आपल्या मोबाइल नंबरवर आपल्याला चार अंकी ओटीपी नंबर मिळेल. लस देण्यापूर्वी ही एक महत्त्वाची पायरी आहे. जोपर्यंत आपल्याला हे ओटीपी प्राप्त होत नाही तोपर्यंत लस घेऊ नका. कोविन सिस्टमवर आपली नोंदणी पूर्ण होईपर्यंत आपण लस प्रमाणपत्र डाउनलोड करता येणार नाही. तसेच, ही ओटीपी नोंदणी प्रणाली बनावट लसीकरण शिबिरांपासून आपल्याला वाचवते.
3. लस घेतल्यानंतर ताबडतोब नोंदणीकृत फोन नंबरवर एसएमएस येईल
लस घेतल्यानंतर लगेचच तुमच्या मोबाईल नंबरवर तु्म्हाला लस प्रमाणपत्र डाउनलोड करण्याच्या लिंकसह आपले संपूर्ण नाव, लसीचे नाव आणि वेळ यासह कोविन प्लॅटफॉर्मवरुन एसएमएस येईल.
4. क्यूआर कोड स्कॅन करून कोविड लसी प्रमाणपत्र वेरिफाय करा
भारतातील सर्व कोविड लस प्रमाणपत्रे एका क्यूआर कोडसह येतात. सत्यता तपासण्यासाठी QR कोड वेरिफाय केला पाहिजे. कोविड लस प्रमाणपत्राची वैधता कशी तपासणार?
- कोविन वेरिफिकेशन वेबसाइट- https://verify.cowin.gov.in/ वर जा.
- वेबसाइटवर "स्कॅन क्यूआर कोड" क्लिक करा.
- जारी केलेल्या प्रमाणपत्रावरील क्यूआर कोड फोनद्वारे स्कॅन करा.
- लस प्रमाणपत्र क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर "Certificate Successfully Verified" दाखवेल आणि नाव, वय, लिंग, बेनिफिशरी आयडी, डोसची तारीख आदी माहिती येईल.
5. जर प्रमाणपत्र खोटे असेल तर लसीकरणाच्या प्रमाणपत्रातील क्यूआर कोड कोविन वेबसाइटवर चालणार नाही
कोविड प्रमाणपत्र नकली असेल तर कोविन वेरिफिकेशन वेबसाइट https://verify.cowin.gov.in वर "Certificate Invalid" दिसेल.
6. आरोग्य सेतु अॅपवर तुमची लसीकरण स्थिती तपासा
लसीची अद्ययावत स्थिती तपासण्यासाठी आरोग्य सेतूवर लॉगिन करा. लॉगिन करण्यासाठी नोंदणीकृत मोबाईल नंबर वापरा.