Nana Patole on Andheri Bypoll Election : एमसीए (MCA) अर्थात मुंबई क्रिकेट असोशिएशनच्या निवडणुकीसाठी अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न सुरु आहेत, असा संशय काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. हा संशय व्यक्त करताना त्यांनी शरद पवार (Sharad Pawar) आणि आशिष शेलार (Ashish Shelar) यांच्याकडे अंगुलीनिर्देश केलं आहे. नाना पटोलेंनी एबीपी एक्स्क्लुझिव्ह (ABP Exclusive) मुलाखत देताना कोणता संशय उपस्थित केला आहे. 


काँग्रेस हा लोकशाहीच्या मार्गानं चालणारा पक्ष : नाना पटोले 


नाना पटोले म्हणाले की, "काँग्रेस हा लोकशाहीच्या मार्गानं चालणारा पक्ष आहे. जे परिवार वादाचे आरोप करतात ते स्वतः परिवार वादात अडकले आहेत. नुसते परिवारवादाचे आरोप लावून चालणार नाही आणि कृतीमध्ये नसणं हे चुकीचं आहे. ज्यांना लोकशाही पद्धत मान्य आहे, त्यांनी काँग्रेसची लोकशाही पद्धत अवलंबली पाहिजे. दोन्ही काँग्रेसचे मातब्बर नेते उमेदवार आहेत. त्यांना संसदीय प्रणालीचा पूर्ण अभ्यास आहे." तसेच, पुढे बोलताना गांधी परिवारापूर्तीच पक्ष नाही तर देशाचा पक्ष आहे. ही मिस कॉल वाली पार्टी नाही. गांधी परिवाराला देशापेक्षा मोठं कोणी नाही. 


बिनविरोध पोटनिवडणुकीच्या मागणीत एमसीएच्या राजकारणाचा कुठेतरी वास : नाना पटोले 


अंधेरी पोटनिवडणुकीबाबत बोलताना नाना पटोलेंनी थेट आशिष शेलार आणि शरद पवारांकडे अंगुलीनिर्देश केले आहेत. ते म्हणाले की, "सध्या एमसीएची निवडणूक सुरु आहे. पैशाच्या खजिन्याची निवडणूक सुरु आहे. एमसीए म्हणजे पैशाचा खजिना. याच पार्श्वभूमीवर जे देशातील आणि राज्यातील लोक चित्र पाहत आहेत. काल एकदम दोन नेत्यांनी बिनविरोध निवडणूक व्हावी अशी भूमिका घेतली. त्यामुळे एमसीएच्या राजकारणाचा कुठेतरी वास यामध्ये येत आहे, असं निश्चितपणे वाटतंय."


पाहा व्हिडीओ : MCAची निवडणूक म्हणजे पैशाच्या खजिनाची निवडणूक, काय घडतंय लोकं बघतायेत : नाना पटोले



"मला थेट असा आरोप नाही लावायचा, पण एमसीएमध्ये जे काही सुरू आहे, त्यावर मी बोलतोय. महाराष्ट्रात आतापर्यंत तीन निवडणूक झाल्यात एकही निवडणूक बिनविरोध झाली नाही. एमसीएच्या निवडणुकीनंतरच हा असा चमत्कार का घडतो? एक व्यक्ती भाजपचा मुंबई शहरातला एका नेत्याच्या घरी जातो आणि त्यानंतर असं काही होतं. यामध्ये नक्कीच एमसीए निवडणुकीचा वास आहे.", असा संशयही नाना पटोलेंनी व्यक्त केला आहे. तसेच, पुढे बोलताना, "एमसीए निवडणुकीत काय झालं हे तुमच्याच माध्यमातून दाखवलं. कोण-कोण एकत्र आलं? अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध झाली तर त्याचा आम्हाला काही विरोध नाही. बाकी जनता समजदार आहे."