Animal Husbandry Recruitment : 2017 ची आणि 2019 ची पशुसंवर्धन विभागातील (Department of Animal Husbandry) भरती रद्द करण्यात आली आहे. राज्य सरकारने याबाबत जीआर (GR) काढून ही माहिती दिली आहे. 2017 ला 138 पदांसाठी तर 2019 ला 729 पदांसाठी जाहिरात काढण्यात आली होती. 2019 च्या भरतीसाठी तब्बल 3 लाख 29 हजार 689 अर्ज विद्यार्थ्यांनी भरले होते. मात्र, आता आरोग्य भरतीनंतर राज्य सरकारकडून पशुसंवर्धन विभागातील भरतीसुद्धा (Recruitment) रद्द करण्यात आली आहे.
एकीकडे राज्य सरकारने अमृत महोत्सवी वर्ष साजरे करत असताना 75 हजार नोकऱ्या देणार असल्याचे सांगितले आहे. तर दुसरीकडे अशाप्रकारे जुन्या भरत्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लोकांमध्ये नाराजीची वातावरण निर्माण होत आहे. दरम्यान, 2017 आणि 2019 ची भरती प्रकिया रद्द करुन पशुसंवर्धन विभाग नव्याने भरती प्रकिया राबवणार आहे. त्यामुळे ही भरती प्रकिया रद्द करण्यात आली आहे. पशुसंवर्धन आयुक्तालयांतर्गत सरळसेवा कोट्यातील गट क आणि ड संवर्गातील रिक्त पदे भरण्याबाबत आधी 2017 आणि नंतर 2019 मध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. पशुवसंर्धन विभागातील 723 पदांसाठी ही जाहिरात काढण्यात आली होती. यासाठी उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले होते. पैसे भरुन विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्जही भरले होते. मात्र आजपर्यंत परीक्षा झाली नाही. शासनाने ही भरतीही रद्द केली.
नवीन भरती प्रक्रिया सुरु झाल्यामुळे रखडलेले अनेक प्रश्न सुटतील
खरंतर पशुसंवर्धन विभागातील परीक्षा रद्द केली नाही. जुनी भरती प्रक्रिया रद्द करुन नवीन भरती प्रक्रिया राबवली जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र राजपत्रित पशुवैद्यक संघटनेचे अध्यक्ष डॉ. रामदास गाडे यांनी दिली. ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षी फी भरली आहे. त्यांची फी देखील परत माघारी देण्यात येणार असल्याचे गाडे यांनी सांगितले. जुन्या भरती प्रक्रियेमध्ये काही त्रुटी होत्या. त्यामुळे जुनी प्रक्रिया रद्द होणार आहे. आता नवीन भरती प्रक्रिया सुरु झाल्यामुळे रखडलेले अनेक प्रश्न सुटतील असे गाडे म्हणाले. सध्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर पशुसंवर्धन विभागातील यंत्रणेची गरज आहे. ही गरज पूर्ण होईल असेही गाडे यावेळी म्हणाले.
तीन वर्षापासून भरती प्रक्रिया रद्द
गेल्या तीन वर्षापासून पशुसंवर्धन विभागातील भरती झालेली नाही. त्यामुळे सरळसेवेमध्ये भरणाऱ्या रिक्त जागांमध्ये मोठी वाढ झाली आहे. आता वर्गवारीनुसार नव्याने जागा वाढवल्या जाणार आहेत. आता सर्व भरती प्रक्रिया नव्याने राबवली जाणार असल्याची माहिती पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्याने दिली आहे. भरती प्रकिया जरी पुढे गेली असली तरी जागा वाढवल्या जातील. ज्या विद्यार्थ्यांची वयाची मर्यादा संपली आहे. त्यांच्याबाबत शासन विचार करेल अशी माहितीही पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.
20 ते 30 टक्के जागा वाढण्याची शक्यता
दरम्यान, पशुसंवर्धन विभागातील भरतीच्या प्रक्रियेमध्ये काही ठिकाणी फसवणूक झाल्याच्या घटना घडल्या होत्या. त्या सर्व गोष्टी समोर आल्या आहेत. त्यामुळे भरती प्रकिया आता नव्याने राबवली जाणार आहे. यावेळी जळपास 20 ते 30 टक्के जागा वाढण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या: