बीड : देशाची आर्थिक राजधानी मुंबई कोरोनाचा हॉट स्पॉट बनली आहे. सुरुवातीलाच राज्य सरकारने लक्ष द्यायला हवं होतं, पण दुर्दैवाने ते दिलं गेलं नाही. म्हणून आता मुंबई महानगरपालिकेकडील कोरोना संदर्भातील यंत्रणा राज्य सरकारने स्वतः हातात घ्यावी. असं केलं तरंच कोरोना नियंत्रणाय येऊ शकतो. अन्यथा खूप कठीण परिस्थिती होईल, असं मत आमदार विनायक मेटे यांनी व्यक्त केलं आहे. यासंदर्भात  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे लेखी पत्र पाठवून मागणी केली, यात 24 महत्वाचे मुद्दे पत्रात नमूद केले आहेत, असंही विनायक मेटे यांनी सांगितलं.



पुढे बोलताना विनायक मेटे म्हणाले की, मुंबई महानगरपालिकेकडील कोरोना संदर्भातील सगळ्या यंत्रणा स्वतः कडे घ्याव्यात. मुंबईतील लोकसंख्या नियंत्रणात येणे गरजेचं आहे. यासाठी परराज्यतील लोकांना त्यांच्या राज्यत जायला परवानगी दयावी. तसेच झोपडपट्टीतील लोकांना त्यांच्या मूळ गावी जाऊ द्या, अशी देखील मागणी त्यांनी केली.


मुंबईमधील 36 विधानसभा मतदारसंघाचे झोन तयार करून आयएएस आणि आयपीएस दर्जाच्या अधिकाऱ्यांची झोनल प्रमुख म्हणून नियुक्ती करावी. त्यांना अधिकार द्यावे. तसेच राज्य सरकारने स्वतःकडे कंट्रोल घ्यावा. तेव्हाच कोरोनावर मात करू शकतो, अन्यथा खूप कठीण परिस्थिती होईल, असं विनायक मेटे यांनी मत व्यक्त केलं.