मुंबई : मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने रखडलेले सर्व शैक्षणिक प्रवेश सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. एसईबीसी प्रवर्गासाठी आरक्षण न ठेवता शैक्षणिक संस्थांमधील प्रवेश करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. 9 सप्टेंबर 2020 नंतरचे सर्व प्रवेश एसईबीसी वर्गासाठी आरक्षण न ठेवता करण्याचा निर्णय राज्य सरकारच्या वतीनं घेण्यात आला आहे.


मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्या होती. त्यानंतर मराठा आरक्षणचा प्रश्न जोपर्यंत मार्गी लागत नाही, तोपर्यंत प्रवेश प्रक्रिया सुरु करु नये अशी मागणी, मराठा वर्गाकडून करण्यात आली होती. त्यानंतर आता मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने रखडलेले सर्व शैक्षणिक प्रवेश सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तसेच यासंदर्भातील जीआरही राज्य सरकारने जारी केला आहे.


गेल्या अनेक दिवसांपासून अकरावीची प्रवेश प्रक्रिया रखडलेली होती. नोव्हेंबर उजाडला तरीही अकारावीची प्रवेश प्रक्रिया रखडलेली होती. त्यामुळे विद्यार्थी आणि पालक यांच्याकडून प्रेवश प्रक्रिया कधी सुरु होणार? असा सवाल वारंवार उपस्थित करण्यात येत होता. अशातच राज्य सरकारने यासंदर्भात अखेर निर्णय घेतला आहे. एसईबीसी प्रवर्गासाठी आरक्षण आता न ठेवता शैक्षणिक संस्थांमधील प्रवेश सरसकट सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे आता खुल्या प्रवर्गातून विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यावे लागणार आहेत. 9 सप्टेंबर 2020 ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज केले होतो, मात्र त्यांना प्रवेश मिळालेले नव्हते. त्यांना आता खुल्या प्रवर्गातून प्रवेश देण्यात येणार आहेत. तसेच हे सर्व प्रवेश मराठा आरक्षण उठवण्यासाठी राज्य सरकारने दाखल केलेल्या याचिकेच्या अधीन असणार आहेत.


दरम्यान, मराठा आरक्षण उठवण्यासाठी राज्य सरकारने एकीकडे याचिका केली आहे. त्यामुळे प्रवेश प्रक्रिया रखडलेली होती. अशातच आता विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया आणखी न रखडवता सुरु करण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :