पंढरपूर :  सरकारी कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोग पाठोपाठ पाच दिवसाच्या आठवड्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याने सरकारी कर्मचारी खुशीत आहे. मात्र सामान्य जनता चिंतेत पडली आहे. राज्यकर्ते संघटित वर्गाच्या मतांवर डोळा ठेवून लोकप्रियतेचे निर्णय घेते. पण कित्येक पटीने जास्त असलेल्या असंघटित जनतेला याचा त्रास भोगावा लागतो. अशाच पद्धतीने जुन्या सरकारने पहिल्यांदा सातव्या वेतन आयोगाचा निर्णय घेत राज्याचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. आता नवीन सरकारने पाच दिवसाचा आठवडा करीत सरकारी बाबूंना खुश करण्याचा प्रयत्न केला आहे.

‘सरकारी काम आणि सहा महिने थांब’ अशा पद्धतीची म्हण आजही तंतोतंत लागू असताना आठवड्यातील कामाचा एक दिवस अजून कमी केल्याने जनतेच्या त्रासात वाढ होणार आहे. वर्षातील सुट्ट्या आणि हक्काच्या रजा यांचे गणित घातले तर या सरकारी बाबूंना वर्षातील 167 दिवस सुट्ट्या मिळणार आहेत. त्यामुळे कामासाठी एका वर्षातील फक्त 198 दिवस उरणार आहेत. सरकारी कार्यालयात केंव्हाही गेलात तरी रिकाम्या खुर्च्या, जनतेचे कामांसाठी हेलपाटे हे चित्र नेहमीचे बनले आहे. आता शासनाने यांच्या कामातील रोजचा अर्धा तास वाढवूंन आठवड्यात एक दिवसाची सुट्टी वाढवली आहे.

कामचुकार पणाचे अनेक अनुभव जनता रोजच सहन करीत असताना आता आठवड्यातील सुट्टीचा एक दिवस वाढला आहे . यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना सलग दोन दिवस आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवून उरलेले पाच दिवस पूर्ण क्षमतेने काम करावे अशी शासनाची अपेक्षा आहे. या निर्णयाचे स्वागत सर्वच कर्मचारी करीत आहेत. विशेषतः जे कर्मचारी नोकरीसाठी कुटुंबापासून लांब आहेत त्यांना याचा खूपच लाभ मिळणार आहे.

5 Days Week For Schools | शाळांनाही पाच दिवसांचा आठवडा सुरू करावा; खासदार सुप्रीया सुळे यांची सूचना



या निर्णयानंतर आठवड्यातील उरलेल्या पाच दिवसात अधिकारी आणि कर्मचारी आपल्या जागेवर बसून पूर्ण क्षमतेने काम करणार का असा प्रश्न जनतेतून विचारला जात आहे. सरकारी कार्यालयात गेल्यावर साहेब दौऱ्यावर आहेत, साहेब मीटिंगला गेलेत अशी छापील उत्तरे जनतेला ऐकायला मिळतात. अशावेळी सरकारी अधिकारी आणि कर्मचारी यांना कार्यालयात कितीवेळ बसायचे आणि कितीवेळात कामे पूर्ण करायचे याचीही नियमावली आधी शासनाने बनविण्याची मागणी जनतेतून होत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांना खऱ्या अर्थाने कामे, मंत्रालयातील बैठका, मंत्र्यांचे दौरे यामुळे कार्यालयीन कामला वेळ देता येत नसल्याने याबाबतही शासनाने काही नियमावली करून जनतेचा त्रास आणि हेलपाटे कमी करण्याबाबत निर्णय करावा लागणार आहे. पाच दिवसाच्या आठवड्यानंतर कर्मचारी खरेच वाढीव अर्धा तास थांबून जनतेची कामे करतात का यावरही नियंत्रण असणे आवश्यक असल्याच्या भावना जनतेतून व्यक्त होत आहेतॉ.

सरकारी कर्मचाऱ्यांना पाच दिवस आठवड्यानंतर वर्षभरात मिळणाऱ्या सुट्टया आणि सवलती 

  • रविवार - 52 दिवस सुट्टी

  • शनिवार - 52 दिवस सुट्टी

  • हक्काच्या रजा - 8  दिवस

  • अर्जित रजा - 30 दिवस

  • वैद्यकीय रजा – 10 दिवस पूर्ण

  • 2020 मधील सरकारी सुट्टया - 20 दिवस यातील 8 दिवस शनिवार रविवार आल्याने मिळणाऱ्या सुट्ट्या -12 दिवस

  • जिल्हाधिकारी अधिकारातील सुट्ट्या - 3 दिवस


एकूण सुट्ट्या - 167 दिवस

एकूण कामाचे दिवस - 198 दिवस

Five day Week | पाच दिवसांचा आठवडा 29 फेब्रुवारीपासून लागू होणार; या आहेत अटी | ABP Majha