मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्यासाठी अल्टिमेटम देऊनही काही ठिकाणी एसटी कर्मचारी आंदोलनावर ठाम आहेत. गेले 54 दिवस सुरु असलेला एसटीचा कर्मचाऱ्यांचा संप मोडीत काढण्यासाठी सरकारकडून प्रयत्न करण्यात आहे. आज पुन्हा एकदा परिवहनमंत्री अनिल परब यांनी एकदा कामावर रूजू होण्याचे आवाहन केले. रुजू झालेल्या दिवशी बडतर्फी आणि निलंबन मागे घेणार असल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे. तसेच कनिष्ठ वेतन श्रेणी संघटनेने संप मागे घेतल्याची घोषणा अजयकुमार गुजर यांनी केली आहे.
एसटी संपावर तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्र राज्य कनिष्ट श्रेणी संघटनेनं जवळपास मंत्रालयात बैठक घेण्यात आली त्यानंतर अनिल परब बोलत होते. बैठकीला परिवहन मंत्री अनिल परब, व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने, महा व्यवस्थापक माधव काळे , संघटनेचे अजय गुजर उपस्थित आहे.
अनिल परब म्हणाले, एसटी विलीनीकरणाच्या मुद्द्यावर समितीचा निर्णय संपकरी आणि राज्य सरकारला मान्य आहे. विलीनीकरणाच्या मुद्द्यावर न्यायालयाच्या समितीचा निर्णय संपकरी आणि राज्य सरकार या दोन्ही बाजूंना मान्य आहे. तसेच शासकिय कर्मचा-यांमध्ये वेतन मिळण्याबाबतच्या मागणीवरही राज्य सरकार संघटनेशी चर्चा करणार आहे. ज्या कर्मचा-यांवर कारवाई करण्यात आली, ते कर्मचारी जर कामावर पुन्हा रूजू झाले तर त्यांच्यावरची कारवाई मागे घेतली जाईल. तसेच त्यांच्यावरील फौजदारी गुन्हे ज्यांच्यावर दाखल झाले आहेत त्यांची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यावर कारवाई मागे घेण्यात येणार आहे.
आत्महत्याग्रस्त कर्मचा-यांची सर्व प्रकरणे तपासून त्याचा अहवाल तयार करुन त्यांच्या वारसांना नोकरी देण्याबाबत विचार केला जाणार आहे. 22 डिसेंबरपर्यंत कर्मचा-यांनी कामावर दाखल व्हावं, ज्या कर्मचा-यांना कामावर बाहेरगावी असल्यानं उशीर होईल त्यांना एक दिवसाची सवलत देण्यात येईल. कर्मचाऱ्यांना कामावर यावं चर्चेतून प्रश्न सुटू शकतात, असे देखील अनिल परब या वेळी म्हणाले.
संबंधित बातम्या :
- ST Workers Strike : विद्यार्थ्यांचा त्रास दूर व्हावा असं वाटत नाही का?, हायकोर्टाचा एसटी कर्मचाऱ्यांना सवाल
- Dhule: मेस्मा कायद्याची बातमी ऐकून एसटी कर्मचाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; मृतदेह घेऊन नातेवाईक विभागीय कार्यालयात
- Ajit Pawar : एसटी कर्मचाऱ्यांनो, सहनशीलतेचा अंत पाहू नका, अन्यथा... अजित पवारांचा इशारा