पुणे : शिक्षक पात्रता परीक्षेतील गैरव्यवहाराप्रकरणी पुणे पोलिसांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष तुकाराम सुपेंच्या घरावर दुसऱ्यांदा धाड टाकली. त्यात पोलिसांनी जवळपास दोन कोटींचं घबाड जप्त केलंय. सुपेंच्या घरातून 1 कोटी 58 लाखांची रोकड आणि सोन्याचे दागिने हस्तगत केल्याची माहिती मिळतेय. याआधी झालेल्या धाडीत पोलिसांनी 90 लाखांचं घबाड हस्तगत केलं होतं. पण पुन्हा पोलिसांचा छापा पडण्याच्या भीतीनं सुपेंच्या पत्नी आणि मेहुण्यानं रक्कम आणि दागिने दुसरीकडे लपवले. पण पोलिसांनी कसून तपास केल्यानंतर रोख रकमेसह ऐवज पोलिसांच्या हाती लागलाय.


याआधीही काही प्रकरणांमध्ये तुकाराम सुपे यांचं नाव समोर आलं होतं. हे तुकाराम सुपे नेमके कोण आहेत?


तुकाराम सुपे नेमके कोण आहेत?


तुकाराम सुपे मूळचे पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील सुपेवाडी गावचे आहेत. गावात त्याकाळात शाळा नसताना शेजारच्या वाडा गावात त्यांनी प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं आणि ते पुढच्या शिक्षणासाठी पुण्यात आले. 


 शिक्षण पूर्ण करून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन ते शिक्षण खात्यात रुजू झाले.
 
पण शिक्षण खात्यातील तुकाराम सुपेंची शिक्षण विभागातील कारकीर्द ही नेहमीच वादग्रस्त राहिलीय . याआधी अनेकदा तुकाराम सुपेंवर कारवाईचा बडगा उगारला गेला. मात्र प्रत्येकवेळी ते नोकरीत परतून महत्वाच्या पदावर रुजू होण्यात यशस्वी ठरले . 


2013 साली तुकाराम सुपे नाशिकचे शिक्षण उपसंचालक असताना बनावट कागदपत्रांच्या आधारे शिक्षकांना मान्यता देऊन संस्था चालकांची फसवणूक केल्याबद्दल त्यांच्यावर फोउजदारी गुन्हा नोंद झाला होता. 


त्यानंतर सुपे पुण्यात दाखल झाले आणि 2014 साली  पुणे महापालिकेच्या शिक्षण मंडळाचे अध्यक्ष बनले. पण इथेही त्यांनी बाजारात शंभर रुपयांना मिळणारी कुंडी एकाच दुकानदारांकडून अकराशे रुपयांना खरेदी करण्याची सक्ती पुण्यातील शाळांना केली होती . त्यानंतर या प्रकरणाची चौकशी होऊन पुण्याचे तत्कालीन महापालिका आयुक्त विकास देशमुख यांनी सुपेंना पदावरून कार्यमुक्त केलं होतं. 


खाजगी शाळांच्या फी वाढीविरोधात आंदोलन करणाऱ्या पालक आणि विद्यार्थ्यांच्या बाबतीत सुपेंची भूमिका नेहमीच बोटचेपी राहिली.
 
2016 साली सुपे पुण्यात एस एस सी बोर्डाचे विभागीय अध्यक्ष म्हणून रुजू झाले.
 
 एक जानेवारी 2018 ला त्यांना महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचे आयुक्त म्हणून नियुक्त करण्यात आले . 


 त्यानंतर सुपेंनी खाजगी कंपन्यांना परीक्षा घेण्याची कामे देण्याचा सपाटा लावला . 


त्यातूनच ब्लॅकलिस्ट करण्यात आलेल्या ए जी टेक्नॉलॉजी कंपनीला त्यांनी ब्ल्याकलिस्टच्या यादीतून बाहेर काढले आणि जुलै 2020 मध्ये त्या कंपनीला टी ई टी ची परीक्षा घेण्याचे कंत्राट दिले.


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha



संबंधित बातम्या 


TET परीक्षा घोटाळा प्रकरण : दुसऱ्या धाडीतही तुकाराम सुपेंच्या घरी घबाड, दोन कोटींहून अधिक रक्कम जप्त 


Mhada Exam Paper : म्हाडा पेपर फुटीच्या चौकशीत धक्कादायक माहिती, वापरला खास Code Word