Maharashtra ST Workers Strike Live: सटी कर्मचाऱ्यांचा संप मिटण्याची शक्यता, वाचा प्रत्येक अपडेट

Maharashtra ST Workers Strike : गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटण्याची आशा निर्माण झाली आहे. पाहा यासंबंधीचे प्रत्येक अपडेट्स...

abp majha web team Last Updated: 26 Nov 2021 05:22 PM
कोल्हापुरातही लालपरी धावली

कोल्हापुरातून इचलकरंजीच्या दिशेने तब्बल 18 दिवसानंतर पहिली एसटी आगाराबाहेर पडली. त्यावेळी कोल्हापूर बसस्थानकावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. पोलिसांच्या बंदोबस्तात ही बस बाहेर पडली. त्याचबरोबर बसला जाळ्याही लावण्यात आल्या आहे.

नाशिकमध्ये पोलीस बंदोबस्त 

एसटी प्रवासासाठी आजपासून पोलीस बंदोबस्त मिळणार आहे. नाशिकमधील सर्वच प्रमुख आगार, मार्गांवर पोलीस तैनात राहणार आहे. बसवरील दगडफेक किंवा अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांची गस्त असणार आहे. यासाठी एसटीच्या सुरक्षेसाठी सहाशेहून अधिक पोलीस, होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत. 

पोलीस संरक्षणात लालपरी धावली

राज्याच्या अनेक आगारात एसटी वाहतुकीला पोलीस संरक्षण दिलं जाणार आहे. प्रमुख मार्गावर एसटी वर दगडफेक किंवा इतर अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांची गस्त असणार आहे. कायदा हातात घेणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. 

एसटी कर्मचाऱ्यांना 41 टक्के वेतनवाढ जाहीर झाल्यानंतर 10 हजार कामगार कामावर परतले

ST Workers Strike : एसटी कर्मचाऱ्यांना 41 टक्के वेतनवाढ जाहीर झाल्यानंतर 10 हजार कामगार कामावर परतल्याचा दावा राज्य सरकारने केला आहे. कर्मचारी कामावर परतले नाही तर कठोर कारवाईचा इशारा परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिला होता. त्यानंतर कर्मचारी हळूहळू कामावर रुजू होत असल्याचा दावा करण्यात आला आहे. सांगलीत सर्व दहा आगारांसह राज्याील 24 आगारांमधील वाहतूक हळूहळू सुरु झाल्याचा दावाही सरकारने केलाय. काल रात्री 8 वाजताच्या आकडेवारीनुसार विविध मार्गांवर 457 बसेसद्वारे 11 हजारांहून अधिक प्रवाशांनी प्रवास केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

ST Workers Strike : काही एसटी कर्मचारी कामावर परतले, काही संपावर ठाम

ST Workers Strike : वेतनवाढ आणि सरकारने कामावर परतण्याचा दिलेल्या अल्टिमेटमनंतर संपकरी एसटी कर्मचारी हळूहळू कामावर परतू लागले आहेत. त्यामुळे राज्यात विविध आगारामधून एसटी धावू लागल्या आहेत. कोल्हापुरातून तब्बल 18 दिवसानंतर एसटी धावलीय. कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत ही एसटी इचलकरंजीच्या दिशेने रवाना झाली. तिकडे वसई आगारातूनही लालपरी धावली आहे. एसटी पुन्हा एकदा सुरु झाल्याने प्रवाशांनी आनंद व्यक्त केलाय. जवळपास दहा हजार एसटी कर्मचारी कामावर परतल्याचा दावा सरकारने केलाय.

नांदेड येथे एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून राज्य सरकारचा निषेध करत,गाजर आंदोलन

काल राज्य सरकारने एस.टी महामंडळ आंदोलनावर बैठकीत तोडगा काढत चार ते पाच हजार पगार वाढ करून आंदोलन मागे घेण्याचा प्रयत्न केला. परंतु नांदेड जिल्ह्यात एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांनी सरकारच्या या पगारवाढीचा व या धोरणाचा काळ्या फिती लावून निषेध करत गाजर आंदोलन केले

आझाद मैदानावरील आंदोलन कर्मचारी विलिनीकरणावर ठाम, आंदोलन सुरुच

आझाद मैदानावरील आंदोलन कर्मचारी हे विलिनीकरण यावरच ठाम असणार आहेत. सदाभाऊ खोत गोपीचंद पडळकर हे जरी आझाद मैदानावर येणार नसले, तरी त्यांचा पाठिंबा आपल्याला आहे 


त्यामुळे ही लढाई अशीच सुरू राहणार असल्याचं एसटी कर्मचारी आंदोलनात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांनी  सांगितलं आहे


 शिवाय , एसटी कर्मचरी शिष्टमंडळ परिवहन मंत्र्यांच्या बैठकीसाठी गेले होतो... त्यांनी सुद्धा कालच्या बैठकीत आम्ही समाधानी नव्हतो, म्हणूनच पत्रकार परिषदेला आम्ही समोर आलो नाही ,असे म्हटले आहे

एसटी कामगारांचं आझाद मैदानावरील आंदोलन मागे, आमदार सदाभाऊ खोत यांची घोषणा

एसटी कामगारांचं आझाद मैदानावरील आंदोलन मागे, आमदार सदाभाऊ खोत यांची घोषणा, खोत म्हणाले, काल सरकारनं जाहीर केलेली वेतनवाढ हा मोठा विजय, पहिला टप्पा आम्ही जिंकलो, विलिनीकरणाच्या मागणीसाठी सोबत असू

एसटी प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांना दोन दिवसांचे अल्टीमेटम, आज आणि उद्या दोन दिवसांत कामावर रुजू व्हा अन्यथा...

एसटी प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांना दोन दिवसांचे अल्टीमेटम


आज आणि उद्या दोन दिवसांत कामावर रुजू व्हा, नाहीतर परवापासून निलंबित कर्मचाऱ्यांवर कायमस्वरुपी बडतर्फीची कारवाई होणार


जे कर्मचारी निलंबीत झालेत ते कामावर रुजु झाल्यास निलंबन माहे घेणार मात्र, परवापासून कामावर रुजु न झालेल्या कर्मचा-यांविरोधात कठोर कारवाई


निलंबीत कर्मचा-यांच्या जागी भरती प्रक्रीयेतील वेटींग लिस्टवरील कर्मचा-यांची भरती करणार


संपावर आहेत मात्र अद्याप निलंबन झालेले नाही अशा कर्मचा-यांवरही परवापासून कारवाईचा बडगा

गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत यांच्यासोबत पत्रकार परिषदेआधी एसटी आंदोलक कर्मचाऱ्यांची चर्चा

गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत यांच्यासोबत पत्रकार परिषदेआधी एसटी आंदोलक कर्मचाऱ्यांची चर्चा 


 पत्रकार परिषदेमध्ये आंदोलनाबाबत निर्णय पडळकर घेतील, आधीच इथले कर्मचारी पुढची दिशा ठरवण्यासाठी चर्चा करताय


त्यामुळे या पत्रकार परिषदेनंतर काहीसे तणावपूर्ण वातावरण आझाद मैदानावर पाहायला मिळू शकते

बुलडाण्यात एकही एसटी कर्मचारी कामावर रुजू नाही , एसटीची चाके थांबलेलीच, आंदोलन सुरूच

काल परिवहन मंत्री अनिल परब यांनी अंतरिम पगारवाढ जाहीर करून व लगेच कामावर रुजू होण्याचं आवाहन करूनही समाधानी न झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी आपला संप सुरूच ठेवला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील सातही आगारात संप सुरूच असून एकही कर्मचारी कामावर न आल्याने आज एकही बस बाहेर पडू शकली नाही. बुलढाणा जिल्ह्यातील कर्मचारी सरकारच्या निर्णयामुळे समाधानी नसून त्यांनी सरकारविरोधात घोषणा देत या निर्णयाचा विरोध केला व जोपर्यंत विलीनीकरण होत नाही तोपर्यंत संप सुरूच ठेवणार असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे आज कर्मचारी कामावर हजर न झाल्याने आज एकही बस सुरू होऊ शकली नाही 

सातारा जिल्ह्यातील एकही एसटी अद्याप एसटी डेपोतून बाहेर पडली नाही

सातारा जिल्ह्यातील एकही एसटी अद्याप एसटी डेपोतून बाहेर पडलेली नाही. एसटी कामगार संघटनेचा निर्णय आज दुपारी अकरा वाजेपर्यंत होईल. एसटी कामगार संघटनेच्या वरिष्ठ कोणत्याही नेत्यांनी अद्याप पर्यंत एसटी सुरू करण्याबाबत सांगितलेलं नाही.  त्यामुळे आम्ही अजून एसटी सुरू केलेला नाहीत. आज अकरा वाजता निर्णय होईल असे साताऱ्यातील  एसटी कामगार संघटनेच्या नेत्यांकडून सांगण्यात आले आहे.

एसटी कर्मचारी संपाला ब्रेक लावणार का?

सरकारने दिलेल्या प्रस्तावावर चर्चा करणार आणि आज (गुरुवारी) यावर भूमिका स्पष्ट करणार असल्याचं एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात सहभागी असलेले भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगितलं आहे. सकाळी 11 वाजता माध्यमांसमोर आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचं गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी सांगितलं. त्यामुळे सरकारनं केलेल्या घोषणेनंतर तरी आता एसटी कर्मचारी संपाला (ST Workers Strike) ब्रेक लावणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

राज्य सरकारकडून मूळ वेतनात वाढ करण्याचा निर्णय

Maharashtra ST Workers Strike : एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटावा म्हणून राज्य सरकारने त्यांच्या मूळ वेतनात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे चेंडू आता संपकऱ्यांच्या कोर्टात असून त्यावर चर्चा करण्यात येत आहे. अशातच काल (बुधवारी) एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाबाबत झालेल्या कालच्या बैठकीबाबत आम्ही सकारात्मक आहोत. सरकारने दिलेल्या प्रस्तावावर चर्चा करणार आणि आज (गुरुवारी) यावर भूमिका स्पष्ट करणार असल्याचं एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात सहभागी असलेले भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगितलं आहे. सकाळी 11 वाजता माध्यमांसमोर आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचं गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी सांगितलं. त्यामुळे सरकारनं केलेल्या घोषणेनंतर तरी आता एसटी कर्मचारी संपाला (ST Workers Strike) ब्रेक लावणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

पार्श्वभूमी

Maharashtra ST Workers Strike : वेतनवाढ आणि सरकारने कामावर परतण्याचा दिलेल्या अल्टिमेटमनंतर संपकरी एसटी कर्मचारी हळूहळू कामावर परतू लागले आहेत. त्यामुळे राज्यात विविध आगारामधून एसटी धावू लागल्या आहेत. कोल्हापुरातून तब्बल 18 दिवसानंतर एसटी धावलीय. कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत ही एसटी इचलकरंजीच्या दिशेने रवाना झाली. तिकडे वसई आगारातूनही लालपरी धावली आहे. एसटी पुन्हा एकदा सुरु झाल्याने प्रवाशांनी आनंद व्यक्त केलाय. जवळपास दहा हजार एसटी कर्मचारी कामावर परतल्याचा दावा सरकारने केलाय.


एसटी कर्मचाऱ्यांना 41 टक्के वेतनवाढ जाहीर झाल्यानंतर 10 हजार कामगार कामावर परतल्याचा दावा राज्य सरकारने केला आहे. कर्मचारी कामावर परतले नाही तर कठोर कारवाईचा इशारा परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिला होता. त्यानंतर कर्मचारी हळूहळू कामावर रुजू होत असल्याचा दावा करण्यात आला आहे. सांगलीत सर्व दहा आगारांसह राज्याील 24 आगारांमधील वाहतूक हळूहळू सुरु झाल्याचा दावाही सरकारने केलाय. काल रात्री 8 वाजताच्या आकडेवारीनुसार विविध मार्गांवर 457 बसेसद्वारे 11 हजारांहून अधिक प्रवाशांनी प्रवास केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 


दुसरीकडे राज्याच्या अनेक आगारात एसटी वाहतुकीला पोलीस संरक्षण दिलं जाणार आहे. प्रमुख मार्गावर एसटी वर दगडफेक किंवा इतर अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांची गस्त असणार आहे. कायदा हातात घेणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. 


नाशिकमध्ये पोलीस बंदोबस्त 


एसटी प्रवासासाठी आजपासून पोलीस बंदोबस्त मिळणार आहे. नाशिकमधील सर्वच प्रमुख आगार, मार्गांवर पोलीस तैनात राहणार आहे. बसवरील दगडफेक किंवा अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांची गस्त असणार आहे. यासाठी एसटीच्या सुरक्षेसाठी सहाशेहून अधिक पोलीस, होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत. 


कोल्हापुरातही लालपरी धावली 


कोल्हापुरातून इचलकरंजीच्या दिशेने तब्बल 18 दिवसानंतर पहिली एसटी आगाराबाहेर पडली. त्यावेळी कोल्हापूर बसस्थानकावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. पोलिसांच्या बंदोबस्तात ही बस बाहेर पडली. त्याचबरोबर बसला जाळ्याही लावण्यात आल्या आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.