मुंबई : एसटी विलिनीकरणाबाबतची भूमिका सरकारने सुद्धा स्पष्ट सांगितली की ते शक्य नाही. आता त्यामध्ये सुधारणा अशी आहे कोर्टातून त्याबाबत समिती नेमून त्या समितीच्या बाबतची भूमिका आम्ही मान्य करु असं सरकारने सांगितलं आहे. त्यामुळे विलिनीकरणाबाबतचा प्रश्न आता न्यायप्रविष्ट आहे, त्यामुळे त्यावर भाष्य करणे योग्य नाही असं जेष्ठ नेते खासदार शरद पवारांनी स्पष्ट केलं. एसटी संप आणि कर्मचाऱ्यांच्या मागण्यावर चर्चा करण्यासाठी आज खासदार शदर पवार, राज्याचे मंत्री अनिल परब आणि एसटी कर्मचारी कृती समिती यांच्यामध्ये बैठक झाली. त्यानंतर शरद पवार बोलत होते. 

Continues below advertisement

एसटी विलिनीकरणाच्या मुद्द्यावर खासदार शरद पवारांनी आज थेट भाष्य केलं. विलीनीकरणाच्या मुद्द्यावर राज्य सरकारची भूमिका काय आहे या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले की, "आपल्याला यावर राजकारण करायचे नाही. एसटीची बांधिलकी ही प्रवाशांशी आहे. विलीनीकरणाच्या मागणीवर राज्य सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. हा मुद्दा आता न्यायप्रविष्ट असल्याने त्यावर काही भाष्य करणे योग्य नाही."

दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्याबाबत सरकार सकारात्मक आहे, एसटीची बांधिलकी प्रवाशांशी आहे, त्यामुळे एसटी सुरु झाली पाहिजे यावर एकमत झाल्याची माहिती खासदार शरद पवारांनी दिली. 

Continues below advertisement

शरद पवार म्हणाले की, "आनंद गोष्टीचा एका गोष्टीचा आहे, कृती समितीचे 20-22 प्रतिनिधी आहेत त्या सर्वांना कामगारांच्या प्रश्नांचा जसा आग्रह आहे जो रास्त आहे, त्याप्रमाणे प्रवाशांचं हित आणि एसटी टिकली पाहिजे, याही बाबतीत ते सकारात्मक आहेत. त्यामुळे त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन केलं आहे. माझं आवाहन आहे कर्मचाऱ्यांना आपली बांधीलकी प्रवाशांशी आहे, जे आवाहन कृती समितीने कर्मचाऱ्यांना केलं आहे त्याचा गांभीर्याने विचार कर्मचाऱ्यांनी करावा."

राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब म्हणाले की, कर्मचाऱ्यांनी कोणतीही भीती न बाळगता कामावर परत यावं. कामावर परत आलेल्या कर्मचाऱ्यांवर कोणतीही कारवाई करण्यात येणार नाही. 

संबंधित बातम्या :