मुंबई : संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर आता 'मेस्मा' अंतर्गत कारवाई करण्याचा इशारा परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिला आहे. परिवहन मंत्र्यांचा अॅक्शन प्लान तयार असून  कोणत्याही क्षणी मेस्मा अंतर्गत कारवाई करण्याची शक्यता आहे. जर एसटी महामंडळानं ही कारवाई सुरु केली तर कोणत्याही नोटीशीविना या कर्मचाऱ्यांना अटक करण्याची शक्यता आहे.  एक वर्षाचा कारवास देखील होऊ शकतो.अत्यावश्यक सेवेअंतर्गत कारवाई केली जाऊ शकते. 


मुख्यमंत्री -उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून कोणत्याही क्षणी राज्यात कारवाईला सुरुवात होण्याची शक्यता आहे. व्हाट्सअॅप फॉरवर्ड करणारे किंवा इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून अफवा पसरवणारे यांच्यावरही कारवाईची शक्यता आहे. 


वेतन वाढ व एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण करावे यासाठी राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. सरकार, एसटी महामंडळाने संपावर तोडगा म्हणून वेतनवाढीची घोषणा केली आणि कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर रुजू होण्याचे आवाहन परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी केले. सरकारच्या आश्वासनावर विश्वास ठेवत अनेक कर्मचारी कामावर रूजू झाले तर  अजूनही मोठा कर्मचारी वर्ग अजूनही संपावर आहे.  आतापर्यंत नऊ हजार कर्मचाऱ्यांचे निलंबन आणि दोन हजारच्या जवळपास कर्मचाऱ्यांची सेवा समाप्ती करण्यात आली आहे.  संप मागे घेतला जात नसल्यानं महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा देखभाल कायदा लावण्याची शक्यता आहे.  मेस्मानुसार महामंडळाला संपावर असलेल्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करता येणार आहे. 


शुक्रवारी 192 कर्मचाऱ्यांचे निलंबन


शुक्रवारी 3 डिसेंबर रोजी संपात सहभागी असलेल्या 192 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले तर 61 कर्मचाऱ्यांची सेवा समाप्ती करण्यात आली आहे. शुक्रवारी 3 डिसेंबर आलेल्या आकडेवारीनुसार 9384  कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले. तर 1980 कर्मचाऱ्यांची सेवा समाप्ती करण्यात आली आहे. 


ST Workers : एसटीच्या संपकरी कामगारांवर कोणत्याही क्षणी मेस्मा अंतर्गत कारवाई



संबंधित बातम्या :


एसटी कर्मचाऱ्यांवर मेस्मा कायद्यान्वये होणार कारवाई; जाणून घ्या Mesma Act म्हणजे काय?


ST Strike : संपकऱ्यांना धक्का; सेवा समाप्ती केलेल्या कर्मचाऱ्यांना एसटीची दारे बंद?


पुन्हा संप करणार नाही; हमीपत्रावर घेतली जातेय एसटी कर्मचाऱ्यांची स्वाक्षरी?