औरंगाबाद : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला आर्थिक मदत आणि एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन यासंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन मंत्री अनिल परब व परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील यांच्या समवेत आज 4 ऑगस्ट रोजी मंत्रालयात बैठक पार पडली. या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाकरिता 550 कोटी रूपयांचा निधी सवलत मुल्यांचा प्रतिपूर्तीपोटी अग्रीम म्हणून दिलेले आहेत. या रकमेतून एसटी कर्मचाऱ्यांचे मार्च महिन्याचे 25 टक्के, मे महिन्याचे 50 टक्के व जून महिन्याचे संपूर्ण वेतन देण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक) संघटनेच्या वतीने करण्यात आली होती.

Continues below advertisement


एसटी कर्मचाऱ्यांचे शासन निर्णयानुसार मार्च महिन्याचे 75 टक्के वेतन दिलेले होते. परंतु संदर्भ क्रमांक 4 अन्वये महाराष्ट्र शासनाने मार्च 2020 चे उर्वरीत वेतन दुसऱ्या टप्प्यात प्रदान करण्यासंदर्भात शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. सदर शासन निर्णयानुसार मार्च 2020 चे उर्वरीत 25 टक्के वेतन व मे महिन्याचे वेतन 50 टक्के देणे बाकी आहे. तसेच जून महिन्याचे वेतन अद्यापपर्यंत देण्यात आलेले नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या मुलभूत गरजा भागविणे अशक्य झालेले आहे.


एसटी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, थकित वेतनासाठी 550 कोटी रुपये मंजूर


महाराष्ट्र शासनाने एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाकरता 550 कोटी रूपये मंजुर केलेले आहेत. या रकमेतून कर्मचाऱ्यांच्या वेतनाशिवाय इतरत्र खर्च करण्यात येऊ नये अशी मागणी करण्यात आली होती. त्यानुसार आज एसटी प्रशासनाने मार्च महिन्याचे उर्वरीत 25 टक्के वेतन तसेच मे महिन्याचे 50 टक्के वेतन यासह जून महिन्याचे 100 टक्के वेतन एसटी कर्मचाऱ्यांना देण्यासंदर्भात आदेश प्रसारित केले असल्याची माहिती महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक) संघटनेचे सरचिटणीस मुकेश तिगोटे यांनी सांगितले.


एसटीसमोर गुडघ्यावर बसून सेवानिवृत्त कंडक्टर ढसाढसा रडला, फोटो व्हायरल


एसटी कर्मचाऱ्यांचे पावणे दोन महिन्याचे वेतन जमा होणार आहे. परंतु भारतीय स्टेट बँक या बँकेत खाते आहेत, अशा कर्मचाऱ्यांचे वेतन (CMP) प्रणालीव्दारे आज त्यांच्या खात्यात जमा होतील. ज्या विभागातील वेतनाबाबत पूर्ण तयारी नसल्यास अथवा त्यांच्याकडे तांत्रिक अडचणी असल्यास अशा विभागाचे उद्या किंवा सोमवारपर्यंत पगार होणार आहेत. स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑप बँक लि., मुंबई या बँकेत पगार खाते असतील अशा कर्मचाऱ्यांचे वेतन सोमवारी होतील.