ST Workers Protest Live : गुणरत्न सदावर्तेंना अटक, सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल

ST Strike at Sharad Pawars House : शरद पवारांच्या घराबाहेर कर्मचारी आक्रमक झाले आहे. विलीनीकरणाच्या मागणीसाठी कर्मचारी आक्रमक झाले आहे. 

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 08 Apr 2022 10:13 PM
Kirit Somaiya : 'विक्रात' निधी प्रकरणी किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांना ट्रॉम्बे पोलिसांचे समन्स

'विक्रात' निधी गैरव्यवहार प्रकरणी किरीट सोमय्या आणि निल सोमय्या यांना ट्रॉम्बे पोलिसांनी समन्स बजावले आहे. उद्या सकाळी 11 वाजता हजर रहायला सांगितले.

Gunratna Sadavarte: अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना अटक; सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Sharad Pawar : एसटी कर्मचाऱ्यांचे वकील अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. आता त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.

सोलापुरात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक, गुणरत्न सदावर्ते आणि भाजपच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. कार्यकर्त्यांनी गुणरत्न सदावर्ते आणि भाजपच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले आहे. पुतळा दहन करताना आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. सोलापुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात हे आंदोलन करण्यात आले. 

शरद पवार यांच्या गोविंद बाग आणि अजित पवारांच्या सहयोग सोसायटी या निवासस्थाबाहेर पोलिसांचा बंदोबस्त वाढला

बारामतीतील शरद पवार यांच्या गोविंद बाग आणि अजित पवारांच्या सहयोग सोसायटी या निवासस्थाबाहेर पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे.

Aurangabad News Update : औरंगाबादमधील एमजीएम परिसरातील गार्डनमध्ये दोन गटामध्ये वाद 

Aurangabad News Update : औरंगाबादमधील एमजीएम परिसरातील गार्डनमध्ये दोन गटात वाद झाला आहे. एका तरुणाने दगड दुचाकीवर दगड टाकल्याने हा वाद झाल्याची माहिती मिळत आहे.  या वादामुळे काही काळ या परिसरात तणावाचं वातावरण होतं.   

 Sadawarte :  गुणरत्न सदावर्ते यांच्या घरी मुंबई पोलिस दाखल

 Sadawarte :  गुणरत्न सदावर्ते यांच्या घरी मुंबई पोलिस दाखल झाले आहेत. 

Sharad Pawar : शरद पवारांच्या घरावरील हल्ल्याची विश्वास नांगरे पाटलांच्या नेृतत्वात चौकशी होणार

Sharad Pawar :  शरद पवारांच्या घरावरील हल्ला हे तपास यंत्रणेला आलेले अपयश होते का? याची चौकशी होणार आहे.  विश्वास नांगरे पाटलांच्या नेृतत्वात चौकशी  होणार आहे. 

Anil Parab :  शरद पवार यांच्या घरी घडलेला प्रकार निंदनीय : अनिल परब

Anil Parab :  शरद पवार यांच्या घरी प्रकार घडला तो निंदनीय आहे. आम्ही कोणतीही कारवाई करणार नव्हतो, अशी प्रतिक्रिया अनिल परब यांनी दिली आहे. 

Sharad Pawar : एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी आहोत, पण चुकीच्या नेतृत्वाच्या पाठीशी नाही : शरद पवार

Sharad Pawar :  आपण एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी आहोत, पण चुकीच्या नेतृत्वाच्या पाठीशी नाही. चुकीचा रस्ता कुणी दाखवत असेल, तर त्या रस्त्याला विरोध करणं ही तुमची माझी सगळ्यांची जबाबदारी आहे, एव्हढंच मी सांगतो, असे शरद पवार म्हणाले आहेत. 

देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला

आज देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला जाणार आहेत. 

Devendra Fadnavis : शरद पवारांच्या निवासस्थानी झालेली घटना सर्वार्थाने चुकीची : देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis :  ज्येष्ठ नेते शरद पवार साहेब यांच्या निवासस्थानी झालेली घटना सर्वार्थाने चुकीची आहे. नेते कुठल्याही पक्षाचे असोत, घरांवर अशी आंदोलने अजीबात समर्थनीय नाहीत. मी या घटनेचा तीव्र निषेध करतो. गेल्या पाच महिन्यांहून अधिक काळपासून एसटी कर्मचारी आंदोलन करीत आहेत. त्यांच्या व्यथा, मागण्या योग्यप्रकारे व योग्य व्यासपीठावरच मांडल्या जाव्यात आणि त्या ऐकून घेतल्या जाव्या, अशी अपेक्षाही या निमित्ताने व्यक्त करतो.

Mumbai Police : आझाद मैदानातील आजच्या आंदोलनाची वेळ संपली, आंदोलनकर्त्यांना घरी जाण्याचे मुंबई पोलिसांचे आवाहन

 Mumbai Police :  आझाद मैदानात मुंबई पोलिसांकडून घोषणा करण्यात आली आहे. आजच्या आंदोलनाची वेळ संपली आहे. सहानंतर कुणालाही थांबता येणार नाही.  सर्वांनी शांततेत आपापल्या घरी निघून जावं, असे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे. 

SharaD Pawar : चुकीच्या हातात संपाचं नेतृत्व गेल्यास त्याचं दुष्परिणाम काय होतात हे आज दिसलं; जितेंद्र आव्हाड

आज जे काही झालं ते महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा अपमान आहे. एखाद्या संपाचं नेतृत्व चुकीच्या हातात गेल्यास त्याचे  दुष्परिणाम काय होतात हे आज दिसलं अशी प्रतिक्रिया राज्याचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. 

Sharad Pawar :  शरद पवार हे सिल्वर ओकवरून पुण्याला रवाना

Sharad Pawar :  शरद पवार हे सिल्वर ओकवरून पुण्याला रवाना झाले आहे. 

Narayan Rane On mahavikas Aghadi : पैसे खाणं हा शिवसेनेचा धर्म आहे - नारायण राणे

लोकांच्या मेहनतीचे पैसे सरकारने खाऊ नयेत. अवकाळी पाऊस, शेतकरी, मजूर, बेरोजगार, एसटी कर्मचारी यासगळ्यांकडे सरकारचं दुर्लक्ष करतंय. सरकार बेकायदेशीर कामाचं समर्थन करतंय, असे नारायण राणे म्हणाले. 

ST Workers Protest :  आंदोलकांना भडकवण्याचं काम : हसन मुश्रीफ

ST Workers Protest :  आंदोलन सुरू झाल्यापासूनच एसटी कर्मचाऱ्यांना खोटी आमिषे दाखवून त्यांना भडकवण्याचं काम केलं जात आहे, असा आरोप हसन मुश्रीफ यांनी केला आहे. 

ST Workers Protest : गुणरत्न रदावर्ते यांची भाषणं तपासून पाहिली पाहिजेत : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

ST Workers Protest : गुणरत्न रदावर्ते यांची भाषणं तपासून पाहिली पाहिजेत. या बरोबरच आज झालेल्या संपूर्ण घटनेची चौकशी केली पाहिजे, अशी मागणी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे. 

Narayan Rane On mahavikas aghadi : राज्यकर्त्याने कर्मचाऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये -नारायण राणे

राज्यकर्त्यांनी कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढायची धमकी देऊ नये. त्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये. 

Sharad Pawar : शरद पवारांच्या घरी राष्ट्रवादीचे नेते जमण्यास सुरुवात, आदित्य ठाकरेही पोहोचले

शरद पवारांच्या सिल्व्हर ओक या घरासमोर आंदोलन झाल्यानंतर आता त्या ठिकाणी राष्ट्रवादीचे नेते जमण्यास सुरुवात झाली आहे. दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, विद्या चव्हाण या पोहोचल्या असून आदित्य ठाकरेही सिल्व्हर ओकवर पोहोचले आहेत. 

Sharad Pawar : आझाद मैदानाभोवती पोलिसांकडून पूर्णपणे बॅरिकेटिंग

सिल्व्हर ओक या शरद पवारांच्या घरासमोर एसटी संपकऱ्यांच्या एका गटाने आंदोलन केल्यानंतर आता आझाद मैदानाभोवती पोलिसांनी पूर्णपणे बॅरिकेटिंग लावलं आहे. या ठिकाणी कोणालाही प्रवेश करण्यास बंदी असून बाहेर पडण्यास मुभा आहे. 

एसटी कर्मचाऱ्यांचा जवळपास सर्व मागण्या मंजूर केल्या, पवारांच्या घरावर जाणं निंदनीय : छगन भुजबळ

एस टी कर्मचाऱ्यांना विनंती करायची आहे, गेली कित्येक महिने आपण संपावर आहेत आपल्या जवळपास सर्व मागण्या मंजूर केल्या. हायकोर्टाने प्रत्येकवेळा तुम्हाला सांगितलं काही मार्ग सुचवलं एवढं सगळं झाल्यानंतर पवार साहेबांच्या घरावर जाण्याचा काही कारण नव्हतं. एवढ्या सगळ्या लोकांना पर्मनंट करणं शक्य नव्हतं हे हायकोर्टाने नेमलेल्या समितीने सांगितलेलं होत ते कामगारांना ही मान्य होतं. एवढा पगार दिला तर विकासकामांना एक रुपयाही शिल्लक राहणार नाही. तरीही पैसे वाढवून दिले. मात्र तरीही अशाप्रकारे पवार साहेबांच्या घरावर जाणं निंदनीय आहे. यांचे बोलविते धनी हे वेगळे असण्याची शक्यता आहे. पवार साहेबांच्या अंगावर जाणं योग्य नाही

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला आज अचानक जे अनिष्ट वळण लागले ते अनुचित आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय पवार साहेबांच्या मुंबईतल्या निवासस्थानाबाहेर झालेली निदर्शने अस्थानी व अनाठायी आहेत. कर्मचाऱ्यांच्या भावना भडकावणारे कोण हे सर्वश्रुत आहे. एसटी कर्मचाऱ्यांसाठी महाविकास आघाडी सरकारने चर्चेचा मार्ग नेहमीच मोकळा ठेवला आहे. न्यायालयीन प्रक्रियेचा आदर करणे क्रमप्राप्त आहे. सांविधानिक मार्गाने तसेच संवादाच्या माध्यमातून त्यांनी आपले प्रश्न समोर मांडावेत. आंदोलनाला अनिष्ट वळण देऊन कर्मचाऱ्यांनी कायदा हातात घेऊ नये, असे आंदोलकांना नम्र आवाहन आहे.

Sanjay Raut : पडद्यामागून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न : संजय राऊत


Sanjay Raut : आजची घटना दुर्दैवी आहे. पडद्यामागून वातवरण बिघडवण्याचा प्रयत्न केले आहे. आजचे आंदोलन हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारे नव्हते, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.

अज्ञात शक्ती पडद्यामागून वातावरण बिघडवण्यासाठी हालचाली करत आहे : संजय राऊत

अत्यंत दुर्दैवी आणि चिंता वाटावी असा प्रकार, सरकारने मार्ग काढण्यासाठी सर्व उपाययोजना आणि चर्चा केली. बहुतेक सर्व मागण्या मान्य झाल्या. अज्ञात शक्ती पडद्यामागून वातावरण बिघडवण्याचं आणि विशिष्ट गटाची डोकी भडकावून अशी कृत्य घडावीत यासाठी सातत्याने हालचाली करत आहे. महाराष्ट्राचं महाविकास आघाडी सरकार त्यांच्या डोळ्यात खुपतंय  : संजय राऊत 

Pravin Darekar : शरद पवारांनी आश्वासन पाळले नाही म्हणून कर्मचारी आक्रमक : प्रवीण दरेकर

Pravin Darekar :  एसटी कर्मचाऱ्यांना गेली पाच महिने दाबण्याचा प्रयत्न केला त्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे. लढू किंवा मरू या स्थितीत कर्मचारी असल्याने कर्मचारी आक्रमक झाले आहेत .या सगळ्या परिस्थितीला महाविकास आघाडी सरकार कारणीभूत आहे. पवार साहेब यांनी वेळोवेळी कर्मचाऱ्यांना सरकारमध्ये विलीनीकरण करण्याबाबत आश्वासन दिलं होतं. मात्र ते आश्वासन पाळलं गेलं नसल्याने एसटी कर्मचारी महाविकास आघाडीचे सर्वेसर्वा पवार साहेब यांच्या घरी गेले असतील असं भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी मत व्यक्त केलंय.

दगडाच्या काळजाचं सरकार, हा विषय सहानुभूतीने हाताळायला हवा होता : प्रवीण दरेकर

120 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यानंतरही सरकारला गांभीर्य नाही, विषय कोर्टात असताना कठोर कारवाईची भाषा केली, हा मग्रूरपणामुळे कर्मचारी हतबल, त्यामुळे कर्मचाऱ्यांसमोर पर्याय उरला नाही, म्हणून हातात चप्पल शरद पवार यांच्या निवासस्थानी आंदोलन. दगडाच्या काळजाचं सरकार आहे.

ST Protest : घटनास्थळी  राष्ट्रवादीचे कार्यकर्ते दाखल

NCP Worker :  घटनास्थळी  राष्ट्रवादीचे कार्यकर्ते दाखल झाले आहे. सदावर्तेच्या बगलबच्च्यांनी हे केलेले आहे. आम्हाला आदेश दिले तर आम्ही घकात घुसून मारू. आंदोलनस्थळी रष्ट्रवादीचे कार्यकर्ते देखील आक्रमक झालेले पाहायला मिळाले

आंदोलकांना ताब्यात घेऊन पुन्हा आझाद मैदानात नेलं

शरद पवार यांच्या घराबाहेर आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ताब्यात घेऊन पुन्हा आझाद मैदानात नेलं जात आहे. अजूनही काही कर्मचारी पवारांच्या निवासस्थानाबाहेर आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही आक्रमक झाले आहेत.

  Anil Parab : परिवहन मंत्री अनिल परब यांच्या शासकिय निवासस्थानाबाहेर सुरक्षा वाढवली

  Anil Parab : परिवहन मंत्री अनिल परब यांच्या शासकिय निवासस्थानाच्या बाहेर पोलीसांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. 

ST Workers Protest : सुप्रिया सुळे आंदोलकांशी चर्चा करण्यास तयार

माझे आई-वडील आणि मुलगी घरात आहेत, त्यांना भेटून येते आणि तुमच्याशी बोलते, खासदार सुप्रिया सुळे यांचं कर्मचाऱ्यांना आश्वासन

ST Worker Protest in Mumbai : विश्वास नांगरे पाटील आंदोलनस्थळी दाखल

ST Protest : विश्वास नांगरे पाटील आंदोलनस्थळी दाखल झाले आहे. सुप्रिया सुळेंनी आंदोलनकर्त्यांना शांततेचे आवाहन केले आहे. तरी पवारांविरोधात घोषणाबाजी सुरू आहे

Supriya Sule : आंदोलनकर्त्यांची समजूत काढण्यासाठी निवासस्थानाबाहेर सुप्रिया सुळे दाखल

ST Protest : सुप्रिया सुळे आंदोलनकर्त्यांची समजूत काढण्यासाठी निवासस्थानाबाहेर आल्या आहेत

ST Protest  : सरकरवार कर्मचारी नाराज झाल्याने हे आंदोलन : सदाभाऊ खोत

Sadabhau Khot on ST Protest  : सरकरवार कर्मचारी नाराज झाल्याने हे आंदोलन करण्यात आले आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन हे भरकटलेलं  असल्याची  प्रतिक्रिया सदाभाऊ खोत यांनी दिली आहे. 

ST Strike : शरद पवारांच्या घराबाहेरील पोलीस बंदोबस्त वाढवला

दरम्यान, शरद पवारांच्या घराबाहेरील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. अजूनही त्या ठिकाणी आंदोलक आंदोलन करताना दिसत आहेत. 

ST Protest : शासनाच विलिनीकरण पाहिजे या मागणीसाठी एसटी कर्मचारी आक्रमक

ST Protest : शासनाच विलिनीकरण पाहिजे, या मागणीसाठी एसटी कर्मचारी शरद पवरांच्या घराबाहेर आक्रमक झाले आहे.  एसटी कर्मचारी दगडफेक, चप्पलफेक करत आहेत. 

ST Strike : एसटी कर्मचाऱ्यांचे शरद पवारांच्या घरासमोर आंदोलन, जोरदार घोषणाबाजी

संपकरी एसटी कर्मचाऱ्यांच्यामधील एका गटाने आक्रमक भूमिका घेऊन थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील घरासंमोर आंदोलन करायला सुरुवात केली आहे. या ठिकाणी आंदोलक मोठ्या प्रमाणात जमले असून त्यांनी जोरदार घोषणाबाजी करायला सुरुवात केली आहे. 

पार्श्वभूमी

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यकडून शरद पवारांच्या निवास्थानाबाहेर  आंदोलन करण्यात आले आहे. शरद पवारांच्य घराबाहेर दगडफेक. चप्पल फेक करण्यात आली आहे. शरद पवारांच्या घराबाहेर कर्मचारी आक्रमक झाले आहे. विलीनीकरणाच्या मागणीसाठी कर्मचारी आक्रमक झाले आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.