Pune ST Bus News :  पुण्यात स्वारगेट डेपोतील (Pune ST) एसटी महामंडळाची वाहतूक विस्कळीत (Traffic) झाली आहे. पंपावर डिझेलचा (diesel) तुटवडा जाणवल्याने एसटींची मोठी रांग लागली आहे. मागील काही दिवसांपासून या परिस्थितीचा सामना चालक आणि वाहकांना करावा लागत आहे.  अनेक एसटी बसेस एसटी डेपोत डिझेल भरण्यासाठी उभ्या आहे. यामुळे स्वारगेट परिसरातील वाहतूक देखील विस्कळीत झाली आहे. एसटी महामंडळाच्या भोंगळ कारभाराचा प्रवाशांना फटका बसत आहे. 


मागील काही दिवसांपासून वाहक आणि चालकांना डिझेल अभावी अनेक त्रासाला सामोरं जावं लागत आहे. सकाळीच्या वेळी डिझेल मिळत नसल्याने त्यांना मनस्ताप होत आहे. त्यामुळे एसटी महामंडळाने स्वतंत्र पेट्रोल पंप सुरु करावा अशी मागणी चालकांनी केली आहे. स्वारगेट परिसर हा वर्दळीचा परिसर आहे. सकाळी भर चौकात एसटीच्या बसच्या रांगा लागल्या. ऐन ऑफिसच्या वेळी नागरिकांना देखील वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागतो. शिवाय प्रवाशांचा देखील अभावी खोळंबा होत असल्याचं चित्र आहे.