मुंबई सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या मागणीसाठी गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांनी आज दिलेल्या एसटी बंदच्या आवाहनाला फारसा प्रतिसाद मिळताना दिसत नाही. मात्र  आंदोलनावर भाष्य करताना सदावर्ते म्हणाले, आंदोलन सुरू करण्याआधी या सरकारने आम्हाला चर्चेसाठी बोलवलंय. त्यामुळे सरकारच्या भूमिकेनंतर आम्ही आमची भूमिका जाहीर करु. या संपात मोठ्या प्रमाणावर कर्मचारी-कामगार सहभागी होणार असल्याचा दावा करण्यात आला होता मात्र हा दावाही फोल ठरताना दिसतोय. 


सदावर्ते म्हणाले, आज एसटीतले कष्टकरी स्टँडबाय आहेत. सध्याचे सरकार हे लोकभिमुख  सरकार आहे.  उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी या सरकारकडून शिकले घेतलं पाहिजे. सरकारने  कर्मचाऱ्यांना कधीही चर्चेला बोलवलं नव्हतं . आंदोलन सुरु होण्याआधीच बोलवलं आहे. चर्चेच्या निर्णयानंतर आम्ही वाट पाहतोय . 


राज्यभरातील एसटी सेवा सुरळीत


सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या मागणीसाठी  गुणरत्न सदावर्ते(Gunaratna Sadavarte) यांनी आज दिलेल्या एसटी बंदच्या आवाहनाला फारसा प्रतिसाद मिळताना दिसत नाहीये. या संपात मोठ्या प्रमाणावर कर्मचारी-कामगार सहभागी होणार असल्याचा दावा करण्यात आला होता मात्र हा दावाही फोल ठरताना दिसतोय. राज्यभरातील एसटी वाहतूक सुरु आहे. वर्धा विभागातील सकाळच्या सत्रात 100 टक्के वाहतूक सुरु आहे. कोल्हापुरातही सकाळच्या सत्रातील एसटी सुरु आहेत.  माजलगाव आगारातही एसटी बसेस सुरु आहेत. त्यासोबतच ठाणे, पाटोदा, दिग्रस, हिंगोली आणि कळंब आगारातील एसटी बससेवा 100 टक्के सुरु आहे. 


 जवळपास दोन वर्षांपूर्वी एसटी महामंडळाचे विलिनीकरण, सातवा वेतन आयोग, आदींसह विविध मागण्यांसाठी संप पुकारण्यात आला होता. एसटी कर्मचाऱ्यांच्या या उत्सफुर्त संपात गुणरत्न सदावर्ते यांनी उडी घेतली. या संपानंतर एसटी कर्मचाऱ्यांची संघटना त्यांनी सुरू केली. आता, सदावर्ते यांनी एसटी संपाची हाक दिली. मात्र सदावर्तेंच्या आवाहानाला प्रतिसाद नाही. वर्धा, कोल्हापूर, माजलगाव, पैठण, ठाणे,  पाटोदा आगार, दिग्रस आगार, यवतमाळ विभाग, हिंगोली आगार,  कळंब आगारात एसटीची वाहतूक सुरळीत सुरू आहे. 


काय आहेत सदावर्तेंच्या मागण्या?


गुणरत्न सदावर्ते यांनी सांगितले की,  एसटी महामंडळाच्या ताफ्यात 85 टक्के नादुरुस्त बसेस धावत आहे. सातवा वेतन आयोग आणि इतर कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी संप पुकारण्यात आला आहे. 


हे ही वाचा :


ST Bus: गुणरत्न सदावर्तेंकडून आजपासून एसटी बंदचा इशारा, पण राज्यभरातील एसटी सेवा सुरळीत