भोपाळ : भाजपच्या खासदार पूनम महाजन वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. विमानतळावर पोहोचण्यासाठी उशिर होत असल्याने पूनम महाजन यांनी चक्क दोन डब्ब्यांची स्पेशल ट्रेन वापरल्याचा आरोप होत आहे. यामुळे पूनम महाजन टीका होत आहे.


 

 

पूनम महाजन एका कार्यक्रमासाठी मध्य प्रदेशमधील बिना इथे आल्या होत्या. मात्र इथला कार्यक्रम संपण्यासाठी रात्रीचे सात वाजले. यानंतर पूनम यांना रात्री 9.30 वाजता भोपाळ विमानतळावरुन दिल्लीसाठी विमान पकडायचं होतं.

 

 

याच कार्यक्रमात रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हादेखील उपस्थित होते. त्यांच्यासाठी दोन डब्ब्यांची स्पेशन ट्रेनही हजर होती. त्यांना रेल्वेने दिल्लीला जायचं होतं. त्यामुळे दिल्लीला जाणाऱ्या दुसऱ्या ट्रेनला त्यांच्या ट्रेनचा डब्बा जोडून दिला. यानंतर खासदार पूनम महाजन यांनी राज्यमंत्र्यांसाठी असलेल्या ट्रेनने भोपाळला जाण्याचा निर्णय घेतला.

 

 

खरंतर रेल्वे राज्यमंत्र्यांना स्पेशल ट्रेनने प्रवास करण्याची परवानगी असते. परंतु खासदाराला मात्र स्पेशल ट्रेन वापरता येत नाही. त्यांना फार फार तर एसी-1 ने प्रवास करण्याची परवानगी आहे. मात्र पूनम महाजन यांनी हे नियम तोडून स्पेशल ट्रेनचा वापर केल्याने त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात येत आहे.