नवी दिल्ली: विविध आरोपांच्या चक्रव्यूहात अडकलेल्या एकनाथ खडसे यांची खुर्ची धोक्यात आली आहे. कारण भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी एकनाथ खडसेंप्रकरणाचा अहवाल मागितला आहे. राज्य सरकार आणि महाराष्ट्र भाजपकडून त्यांनी हा अहवाल मागितला आहे.

 

भोसरी एमआयडीसीमध्ये बेकायदेशीररित्या जमीन खरेदी केल्याचे पुरावे खडसेंच्याविरोधात आहेत. त्यामुळे खडसेंना मंत्रिमंडळातून हटवलं जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, भाजपचे प्रभारी सरोज पांडे खडसेंसंदर्भातला रिपोर्ट अमित शहांना सादर करतील.

 

याप्रकरणी पक्षाने आणि मुख्यमंत्र्यांनी खडसेंचं स्पष्टीकरणही मागितलंय. मात्र या स्पष्टीकरणामुळे अमित शाह समाधानी झाले नाही, तर त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली जाऊ शकते.

 

विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीलाही एकनाथ खडसेंनी हजेरी लावली नाही. शिवाय जळगावमध्ये खडसेंनी लालदिव्याची गाडीही वापरली नाही. त्यामुळे खडसेंचं मंत्रिपद जाणार की त्यांचं फक्त महसूलमंत्रिपद काढून घेतलं जाणार हे पाहणं महत्वाचं आहे.

 

खडसेंवरील आरोप

*कथित पीए गजानन पाटीलकडून खडसेंच्या नावे 30 कोटी लाच मागितल्याचा आरोप, गजानन पाटीलला अटक

*जावयाची लिमोझिन कार बेकायदा असल्याचा आरोप

*दाऊदच्या कॉलर लिस्टमध्ये खडसेंचा नंबर असल्याचा हॅकरचा दावा

* भोसरी एमआयडीसीतील जमीन खरेदी वाद

संबंधित बातम्या :


एकनाथ खडसेंचं महसूलमंत्रिपद जाणार?


ती जमीन एमआयडीसीचीच, शिवसेनेचा खडसेंवर बाण


..म्हणून विरोधकांनी शकुनी नीती सुरु केली: एकनाथ खडसे


खडसे-दाऊद कथित कॉलप्रकरणी हॅकर मनिष भंगाळे हायकोर्टात


गंमत म्हणून 30 कोटींची लाच मागितली : गजानन पाटील


‘खडसे-दाऊद कथित कॉलप्रकरणाची केंद्रीय नेतृत्वाकडून दखल’


खडसेंचा मोबाईल, दमानियांचा नंबर आणि दाऊद कॉल प्रकरण


खडसेंना क्लिन चीट, मग दाऊद कॉलप्रकरणात पुन्हा हॅकरची चौकशी का?


दाऊद इब्राहिम कॉलिंग प्रकरण : एकनाथ खडसेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र


‘आप’कडून खडसेंच्या चारित्र्यहननाचा प्रयत्न : आंबेडकर