Pune Passport Drive : पासपोर्ट लवकर मिळण्याच्या (passport) उद्देशाने पुण्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये विशेष पासपोर्ट मोहीम जाहीर केली आहे. पुणेकरांना पासपोर्ट अर्ज (Passport Procedure) प्रक्रिया सोपी आणि वेळेत करुन देण्यासाठी (Pune passport Drive) हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. त्यामुळे अनेक पुणेकरांना या उपक्रमाचा लाभ होणार आहे. 


पुण्यातील (Special Passport Drive) प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाच्या अंतर्गत असलेले पासपोर्ट सेवा केंद्र (PSKs) आणि काही पोस्ट ऑफिस, पासपोर्ट सेवा केंद्रे (POPSKS) त्यांच्या कामाच्या तासांमध्ये शनिवारचा (saturday) समावेश करण्यात आला आहे. 15 जुलै, 22 जुलै आणि 5 ऑगस्ट 2023 ला सुरु राहतील. ज्यामुळे व्यक्तींना नवीन पासपोर्ट अपॉंईटमेंट्स बुक करण्यासाठी किंवा त्यांच्या विद्यमान अपॉइंटमेंट्स पुन्हा शेड्यूल करण्यासाठी अतिरिक्त संधी उपलब्ध होतील.


नवीन अपॉइंटमेंट सुरक्षित करण्यासाठी, अर्जदारांनी https://www.passportindia.gov.in/ वर ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण करणे आणि ऑनलाईन पद्धतीने पेमेंट करणे आवश्यक आहे. यानंतर त्यांची अपॉंईटमेंट बुक करण्यासाठी त्याच वेबसाइटवर लॉगइन करावं लागणार आहे. अपॉंईटमेंट निश्चित झाल्यानंतर अर्जदार पोर्टलवरून पावती डाउनलोड करू शकतात.


तात्काळ योजनेअंतर्गत अर्ज करणाऱ्यांनी काय करावं?


- 18 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या अर्जदारांनी https://www.passportindia.gov.in/AppOnlineProject/online/tatkaalPassports येथे  सांगितलेले कोणतेही तीन दस्तऐवज, पत्त्यासह आणि ईसीआर नसलेल्या पुराव्यांसह, लागू असल्याप्रमाणे सबमिट करणे आवश्यक आहे. 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या अर्जदारांनी https://www.passportindia.gov.in/AppOnlineProject/online/tatkaalPassports वर सांगितलेली कोणतीही दोन कागदपत्रे, पत्ता आणि ईसीआर नसलेल्या पुराव्यांसह, लागू करणे आवश्यक आहे.


- सर्व कागदपत्रांमध्ये नमूद केलेली माहिती म्हणजेच संपूर्ण नाव (name), जन्मतारीख (Date of birth) आणि वडिलांचे नाव अचूकपणे जुळत असल्याची खात्री करणे महत्त्वाचे आहे. UIDAI नसलेल्या संस्थांनी छापलेली छोटी कट-आउट आधार कार्डे किंवा स्मार्ट कार्ड स्वीकारले जाणार नाहीत. ही सगळी योजना तातडीने पासपोर्ट हवे असणाऱ्यांसाठी आहे. तत्काळ योजनेचा गैरवापर रोखण्यासाठी मोठे प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे अपात्र श्रेणीतील किंवा आवश्यक कागदपत्रे नसलेले अर्जदार स्वीकारले जाणार नसल्याचं सांगण्यात आलं आहे. पुण्यात मागील काही दिवसांपासून पासपोर्ट काढणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे अनेकांना वेळेच्या वेळी पासपोर्ट मिळणं कठिण होतं. त्यामुळेच हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. जेणेकरुन अनेकांना या उपक्रमामुळे लाभ होणार आहे. 


हेही वाचा-


Indian Passport : भारतीय पासपोर्ट चार रंगात... प्रत्येक रंगाच्या पासपोर्ट धारकांना मिळते विशेष सुविधा