Pune News : खेड शिवापूर एका टोल नाक्यावरील कर्मचाऱ्याला (Pune News) एका ट्रकचालकाने बारा किलोमीटर पर्यंत ट्रकसोबत लटकत नेल्याचं समोर आलं आहे. पुणे सातारा महामार्गावर हा जीवघेणा थरार घडला आहे. अखेर नसरापूर ग्रामस्थांनी ट्रक अडवून लटकलेल्या कर्मचाऱ्यांची सुटका केली आहे. ट्रकचालक मद्यधुंद अवस्थेत असल्याने हा प्रकार घडला आहे. त्यामुळे त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.
नेमकं काय घडलं?
खेडशिवापुर टोल नाक्यावरील कर्मचाऱ्याला एका ट्रक चालकाने 12 किलोमीटरपर्यंत ट्रकला लटकून नेले, तेही पुणे-सातारा या महामार्गावर वेगाने ट्रक चालवत. ट्रक ओव्हरलोड आहे का, हे पाहायला गेलेल्या कर्मचाऱ्याला नशेत असलेल्या ट्रकचालकाने तसाच पुढे जवळपास बारा किलोमीटर पर्यंत लटकत नेला. पुढे नसरापूर येथील गावकऱ्यांनी ट्रक अडवून लटकलेल्या सौरभ कोंडे या टोल कर्मचाऱ्याची सुटका केली आहे. TN48 BC6280 नंबर असलेल्या ट्रकच्या समोरील बाजूस तरुण लटकलेला व्हिडीओत दिसून येत आहे आणि हा सगळं थरार पुणे सातारा महामार्गावरील खेडशिवापुर टोल ते नसरापूर गावापर्यंत चालू होता. अखेर ट्रक आणि चालक यांना किकवी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. हा ट्रक कोठून आला होता, कुठे जात होता, काय सामान होते? या प्रश्नांची उत्तरे पोलिसांच्या तपासानंतरच मिळणार आहे.
मध्यधुंद असवस्थेत सुरु होता थरार...
ट्रकचालक मद्यधुंद अवस्थेत होता. रस्त्याने भरधाव वेगात चालक ट्रक चालवत होता. टोल कर्मचारी ट्रक लोडेड आहे का विचारायला गेल्यावर हा सगळा प्रकार घडला आहे. त्यामुळे चालकावर चांगलाच संताप व्यक्त केला जात आहे.
मध्यधुंद अवस्थेच चालवतातच कसे?
खेडशिवापूर मार्गावर रात्री मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची गर्दी असते. अनेक ट्रकचालक भरधाव वेगाने ट्रक चालवत असतात. त्यामुळे अनेकदा अपघाताची भीती असते. अनेकदा या मार्गावर मोठे अपघातदेखील झाले आहेत. चालकांच्या या मुजोरीमुळे अनेकांचा जीव टांगणीला लागतो. मद्यधुंद अवस्थेत ट्रक चालवणाऱ्यांवर अनेकदा कारवाई होत असते. मात्र तरीही चालक या सगळ्यांकडे दुर्लक्ष करुन मद्यधुंद अवस्थेत ट्रक चालवतात. त्यामुळे अनेक नागरिकांनी या ट्रकचालकांवर कारवाईची मागणी केली आहे. सोबतच यांची मुजोरी खपवून घेणार नसल्याचं नागरिकांकडून बोललं जात आहे.
हेही वाचा-