शिर्डी : राज्यावर करोनाचे संकट आल्यानंतर राज्यातील बहुतेक खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनी आपले ‘बाह्यरुग्ण’ विभाग बंद केले होते. याबाबतच्या तक्रारी वाढल्यानंतर प्रशासनाकडून वैद्यकीय व्यावसायिकांना आपापले बाह्यरुग्ण विभाग सुरु ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या होत्या. मात्र, आपल्याकडे पुरेशा सुरक्षा साधनांची (पीपीई किट) अनुपलब्धता असल्याने आपण धोका पत्करु शकत नाही, असे म्हणत बहुतेक वैद्यकीय व्यावसायिकांनी आपली रुग्णालये बंदच ठेवले होते. या पार्श्वभूमीवर संगमनेर शहरात अनोखा उपक्रम राबवत ‘कोविड 19' रुग्णालय सुरू केलं आहे.


याबाबत प्रशासनाने इंडियन मेडिकल असोसिएशन व निमा या दोन्ही संस्थांच्या पदाधिकार्‍यांशी चर्चा करुन कोरोनासारखीच लक्षणे असणार्‍या रुग्णांची तपासणी करण्यासाठी संगमनेर शहरात अनोखा उपक्रम राबवत ‘कोविड 19 रुग्णालय सुरू केलं आहे. कोरोना लक्षण असणारी सर्व रुग्णसेवा आता एकाच छताखाली होणार आहे. खासगी डॉक्टर दररोज साखळी पद्धतीनं याठिकाणी सेवा देणार हे विशेष.


PM Cares Fund | फक्त पंतप्रधान निधीला केलेली मदतच सीएसआर म्हणून ग्राह्य


साखळी पद्धतीने खासगी डॉक्टरांची सेवा


गेल्या 19 मार्चपासून राज्यासह संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यात करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने भितीदायक वातावरण तयार झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर आपल्याला या विषाणूंची लागण होवू नये म्हणून संगमनेर तालुक्यातील बहुतेक वैद्यकीय व्यावसायिकांनी आपापले बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) बंद ठेवणेच पसंद केले. त्यामुळे सामान्य आजार असलेल्या रुग्णांची परवड होवू लागल्याने व त्यातच सर्दी, खोकला यासारख्या किरकोळ आजाराच्या रुग्णांना थेट कुटीर रुग्णालयात धाडण्यात येवू लागल्याने शासकीय वैद्यकीय यंत्रणा कोलमडण्याची स्थिती निर्माण झाली होती. याबाबत संगमनेरच्या प्रांताधिकार्‍यांनी संगमनेर तालुक्यातील वैद्यकीय व्यावसायिकांच्या इंडियन मेडिकल असोसिएशन व निमा या दोन्ही संस्थांच्या पदाधिकार्‍यांशी चर्चा करुन राष्ट्रीय आपत्तीच्या वेळी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन त्यांना केले. या आवाहनाला प्रतिसाद देताना या दोन्ही संस्थांशी संलग्न असणार्‍या वैद्यकीय व्यावसायिकांनी आवश्यक ती सुरक्षा साधने पुरविल्यास एखाद्या मध्यवर्ती ठिकाणी एकाच ठिकाणी बाह्यरुग्ण विभाग सुरु करुन तेथे साखळी पद्धतीने या दोन्ही संस्थांचे सदस्य रुग्ण तपासणी करतील असे जाहीर केले.


Nashik Corona | मालेगावमध्ये 12 तासात 18 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह


सामान्य रुग्णांना दिलासा
तालुक्याच्या बाबतीतही असाच निर्णय झाल्याने संगमनेरच्या प्रशासनाने संगमनेर नगर पालिकेच्या कॉटेज रुग्णालयाला ‘कोविड 19’ साठी सज्ज केले आहे. यासोबतच पठारभागातील घारगाव, साकूर यासह तळेगाव व निमोण येथेही असेच बाह्यरुग्ण विभाग सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. रुग्णालयांमध्ये सर्दी, खोकला व तापासारखी लक्षणे असलेल्या रुग्णांची स्क्रिनींग करुन शारीरिक तपासणी केली जाणार आहे. कोरोनाची लक्षणे असल्यास अशा रुग्णाचे ‘स्वॅब’ घेवून ते तपासणीसाठी पाठविले जाणार आहेत. या रुग्णालयांमध्ये सेवा देणार्‍या वैद्यकीय व्यावसायिकांच्या सुरक्षेची विशेष काळजी घेण्यात आली असून प्रत्यक्ष रुग्ण तपासणी करणार्‍या वैद्यकीय व्यावसायिकांना पीपीई किट दिली जाणार आहे. कोरोनामुळे खासगी वैद्यकीय व्यावसायिकांमध्येही भितीचे वातावरण होते. त्यामुळे सामान्य रुग्णांना कोणी वाली आहे की नाही असा प्रश्न उभा राहीला होता. मात्र, प्रशासनाने वैद्यकीय व्यावसायिकांशी समन्वय साधून यातून यशस्वी मार्ग काढला आहे. उद्यापासून सर्दी, खोकला व तापासारखी लक्षणे असणार्‍या रुग्णांनी वरील ठिकाणी तपासणी होणार असल्याने त्यांनी तेथेच संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


Corona Around the World | जगभरात कोरोना व्हायरसची सध्याची परिस्थिती काय आहे? World Corona Update