PM Cares Fund सुरु करुन पंतप्रधान मोदींनी सेल्फ प्रमोशनची संधी सोडली नाही : पृथ्वीराज चव्हाण
सीएसआर म्हणजे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलुटी. ज्या कंपन्यांचं भांडवल किमान 5 कोटी रुपये आहे, ज्यांचा टर्नओव्हर 500 कोटींपेक्षा अधिक आहे, कंपन्यांना त्यांच्या नफ्याच्या 2 टक्के रक्कम ही सीएएसआर अंतर्गत कल्याणकारी कामांसाठी खर्च करणं बंधनकारक आहे.कोरोनाच्या संकटात वेगवेगळ्या वैद्यकीय गरजांसाठीही या सीएसआर अंतर्गत मदत केली गेली आहे. अनेक राज्यांनी त्यांच्या मदत मोहीमेत सर्वाधिक प्राधान्य हे मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिलं आहे. त्यामुळे या सहाय्यता निधीला सीएसआर अंतर्गत समाविष्ट का केलं जात नाही असा सवाल आहे. कालच शिवसेनेचा खासदार संजय राऊत यांनीही दूरर्दशनवर दर दोन मिनिटाला पंतप्रधान सहाय्यता निधीत मदत करण्याच्या जाहिराती दाखवल्या जातायत, तशा राज्यातही मुख्यमंत्री सहाय्यता निधीबाबत का दाखवल्या जात नाहीत असा सवाल उपस्थित केला होता.coronavirus | मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या नव्या खात्याची निर्मिती; मदत करण्याचे आवाहन
कोरोनाच्या या संकटाची सर्वात मोठी झळ देशात महाराष्ट्राला बसलेली आहे. केंद्राच्या आर्थिक उत्पादनात सर्वाधिक वाटा महाराष्ट्राचा आहे. तरीही जीएसटीमधला राज्याचा वाटा पूर्णपणे मिळालेला नाही.