पंढरपूर : जन्मठेपेची शिक्षा भोगून आलेल्या माजी पोलिस कर्मचाऱ्याचा मुलगा रणजीत कोळेकरची पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाली आहे. रणजीतचे वडील धुळा कोळेकर यांनी वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याची हत्या केली होती.
धुळा कोळेकर यांनी ९ मे २००२ रोजी वरिष्ठ पोलिसांवर गोळीबार केला होता. यामध्ये एका पोलिस निरीक्षकाचा मृत्यू झाला होता, तर एक उपअधीक्षक आणि एक पोलिस कर्मचारी जखमी झाले होते. या प्रकरणात धुळा यांना जन्मठेपेची शिक्षा झाली होती. या घटनेवर अनेक कादंबऱ्या लिहिल्या गेल्या. तसेच 'जखमी पोलिस 302' हा मराठी चित्रपट देखील बनवला गेला.
धुळा यांचा मुलगा रणजीत कोळेकरने एमपीएससी परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश संपादित केलं आहे. रणजीतची पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाली आहे. आणखी अभ्यास करून क्लास वन अधिकारी बनायचं रणजीतचं स्वप्न आहे. त्यासाठी आणखी मेहनत करण्याची तयारीही त्याने दर्शवली आहे.
धुळा जेलमध्ये गेल्याने कुटुंब उघड्यावर आले होते. मात्र त्यांच्या पत्नीने अनेक संकटांवर मात करत मुलांचं उत्तम संगोपन केलं. मुलांना चांगलं शिक्षण दिलं. रणजीतचा मोठा भाऊ राहुल याने डीएडनंतर संपूर्ण घराची जबाबदारी उचलली. त्यासाठी राहुलने औषधाच्या दुकानात काम करण्यास सुरुवात केली आणि दोन्ही भावांना उच्च शिक्षण घेण्यासाठी मदत केली. रणजीत पोलीस उपनिरीक्षक बनला तर दुसरा भाऊही पोलीस कर्मचारी म्हणून भरती झाला आहे.
पोलिस कॉन्स्टेबल असलेल्या धुळा यांनी पोलिसांवर गोळीबार केला, मात्र त्यांचाच मुलगा आता पोलिस अधिकारी बनला आहे. धुळा कोळेकर 16 वर्षाच्या दीर्घ कारावासानंतर घरी परतले आहेत. जन्मठेपेच्या शिक्षेनंतर धुळा यांना नियतीने दिलेली ही अविस्मरणीय भेट ठरली आहे.
जन्मठेपेची शिक्षा भोगून आलेल्या पोलिसाचा मुलगा पोलीस अधिकारी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
25 Jun 2018 10:51 AM (IST)
जन्मठेपेची शिक्षा भोगून आलेल्या माजी पोलिस कर्मचाऱ्याचा मुलगा रणजीत कोळेकरची पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाली आहे. रणजीतचे वडील धुळा कोळेकर यांनी वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याची हत्या केली होती.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -