परभणी : शहरातील उड्डाणपुलावर दुचाकीच्या अपघातात भाजपचे माजी आमदार मोहन फड यांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. नेमका हा अपघात कसा झाला याची कुणालाही कल्पना नाही. मात्र, दुचाकीचा चकानाचूर झाल्याचे पाहून हा अपघात भयानक असल्याची कल्पना येतेय.



माजी आमदार मोहन फड यांचा लहान मुलगा पृथ्वीराज फड हा मुंबईत शिकतो. लॉकडाऊन मागच्या काही दिवसांपासून तो परभणीत होता. आज संध्याकाळी पावणे नऊच्या सुमारास पृथ्वीराज हा त्याची डुक्याटी या मोटारसायकल वरून गंगाखेड रस्त्याकडे जात असताना उड्डाणपुलावर त्याचा अपघात झाला, त्यात तो गंभीर जखमी झाला होता. यावेळी रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांनी त्याला तातडीने जील्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी हलवले. मात्र, उपचार पूर्वीच त्याचा मृत्यू झाला. ही घटना वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली व फड कुटुंब आणि त्यांचे नातेवाईक जिल्हा सामान्य रुग्णालयात पोचले असुन त्यांच्यावर या अपघाताने मोठा आघात झालाय.


कशेडी घाटात दरड कोसळल्याने 24 तासांनंतर मुंबई गोवा महामार्ग पुर्ववत मात्र दरडीचा धोका कायम!


नेमका अपघात झाला कसा?
संध्याकाळी पृथ्वीराज हा गंगाखेड रस्त्याकडे जात असताना हा अपघात झाला. ज्यात अत्यंत महागडी असलेली त्याच्या डुक्याटी कंपनीची दुचाकी समोरून पूर्णपणे चकनाचुर झाल्याने हा एवढा गंभीर अपघात नेमका कुठल्या वाहनाबरोबर झाला हे मात्र कुणालाही कळु शकले नाही. कारण घटनास्थळी केवळ दुचाकींच पडलेली होती. त्यामुळे त्या वाहनाचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.


Vikas Dubey Encounter | वाहनाचा अपघात ते एन्काऊंटर, विकास दुबेचा खात्मा कसा झाला?