रत्नागिरी : तब्बल 24 तासानंतर कशेडी घाटातील मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग पुर्ववत सुरू झाला आहे. मात्र, महामार्ग क्रमांक 66 वर अनेक ठिकाणी महामार्गाच्या रुंदीकरणादरम्यान लगतचे डोंगर भिंतीसारखे उभे कापण्यात आले आहेत. त्यामुळे सुकेळी खिंडीपासून कशेडीघाट, रघुवीर घाट आणि अन्य सर्वत्र पावसाळ्यामध्ये भूस्खलन होऊन दरडी आणि मातीचे ढिगारे महामार्गावर कोसळण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावर दरडी कोसळण्याचा धोका कायम आहे.


मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरणाच्या अर्धवट कामाचा फटका सध्या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांना बसतोय. काही वर्षे महामार्गावरील रुंदीकरणाचे काम धीम्या गतीने काम सुरू आहे. रुंदीकरणाच्या कामात महामार्गावरील डोंगरकपारीतून अडचणीचा भाग कापण्यात (कट करण्यात) आला. मात्र, त्या भागाला सुरक्षा भिंत बांधकाम करण्यात आले नाही. त्यामुळे सतत पडणाऱ्या पावसामुळे डोंगराळ भागातील माती आणि दरड कोसळून महामार्गावर आली. पावसाळ्यात सुकेळी खिंडीपासून कशेडीघाट, रघुवीर घाट आणि अन्य सर्वत्र पावसाळ्यामध्ये भूस्खलन होऊन दरडी आणि मातीचे ढिगारे महामार्गावर कोसळून महामार्ग ठप्प होण्याचे प्रकार घडत असतात.



गडचिरोलीत आदिवासी बांधव आणि पोलीस सहभागातून किष्टापूरचा शहीद सेतू उभारला


24 तासानंतर कशेडी घाटातील मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग पुर्ववत
गुरूवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास धामणदेवी गावाच्या हद्दीत सुमारे 75 मीटर्स अंतराच्या रस्त्यावर लगतच्या डोंगरातील लाल मातीची दरड डोंगरावरील झाडांसह कोसळल्याने वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली. रात्रभर दरड हटविण्याचे काम महामार्ग रूंदीकरणाच्या वीर ते कातळीबंगला या कामाची ठेकेदार एलऍण्डटी या कंपनीने तीन जेसीबी प्रोकलेन आणि डंपर्सच्या साह्याने सुरू केले. मात्र, शुक्रवारी सकाळी हे काम सुरू असतानाच पावसाचा जोर वाढून आणखी मोठ्या प्रमाणात मातीचा ढिगारा दरडग्रस्त महामार्गावर पुन्हा कोसळला. परिणामी, दृष्टीपथात आलेले हे दरड हटविण्याचे काम पुन्हा तब्बल 16 तासांसाठी लांबणीवर गेले. घाट बंद पडल्याने महामार्गाच्या दुतर्फा चार ते पाच किलोमीटरच्या उभ्या असलेल्या वाहनांच्या रांगा लागल्या. आज पावसाचा जोर ओरसला आणि माती हटविण्याच्या कामाला वेग आला. बरोबर 24 तासानंतर सायंकाळी कशेडी घाटातील मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग पुर्ववत सुरू झाला. त्यामुळे घाटात अडकलेल्या प्रवाश्यांनी सुटकेचा श्वास सोडला.


Kamathe Ghat | पावसाळ्यात कोकणाच्या सौंदर्याला बहर! कामथे घाटात निसर्गाची मुक्त उधळण