छेडछाडीचा जाब विचारणाऱ्या जवानाची अख्ख्या गावासमोर भोसकून हत्या
एबीपी माझा वेब टीम | 14 May 2016 01:37 PM (IST)
धुळे: बहिणीची छेड काढल्याचा जाब विचारणाऱ्या लष्करी जवानाची चाकूनं भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना धुळ्यातल्या सय्यदनगरमध्ये घडली आहे. विनोद पवार असं मृत पावलेल्या जवानाचं नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी 8 जणांना अटक केली आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे हा सगळा प्रकार सरपंच आणि गावातल्या 400 लोकांसमोर घडला. विद्यापीठाच्या परीक्षेसाठी विनोद पवार आपलं मूळगाव असलेल्या सय्यदनगरमध्ये आले होते. त्याचवेळी आपल्या बहिणीची छेड काढणाऱ्यांना विनोद यांनी जाब विचारला. पण त्यांनी विनोद यांना अख्ख्या गावासमोर भोकसून मारलं. पंजाबच्या पठाणकोटमध्ये लष्करी सेवेत असलेले धुळ्याचे जवान विनोद पवार यांची गावात सुट्टीवर आले असताना हत्या करण्यात आली. विद्यापीठाच्या परीक्षेसाठी विनोद पवार आपलं मूळगाव असलेल्या सैय्यदनगरमध्ये आले होते. बहिणीची छेड काढणाऱ्यांना जाब विचारला म्हणून आठ लोकांनी विनोद पवार यांच्यावर धारदार हत्यारानं वार केले. त्यात विनोद यांचा जागीच मृत्यू झाला. विनोद यांच्या बचावासाठी आलेल्या सहा जणांनाही जखमी केलं.