नाशिक : कसारा घाटात टँकर उलटल्यामुळे नाशिक-मुंबई दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली आहे. गॅस टँकरला आज सकाळी लतीफवाडीजळ अपघात झाला. त्यामुळे त्यातून गळती सुरु झाल्याने, खबरदारीचा उपाय म्हणून वाहतूक रोखण्यात आली आहे.
कसारा घाटात वाहतूक थांबवल्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. नाशिक-मुंबई वाहतुकीवर परिणाम झालाच आहे, शिवाय मुंबई- आग्रा महामार्गवर ट्रॅफिक जॅम झालं आहे.