Solar Eclipse : भारतामधील अनेक शहरांमधून या वर्षातले हे शेवटचे ग्रहण पाहता आहे. हे 2022 मधील हे पहिले सूर्यग्रहण आहे जे भारतात दिसणार आहे. सूर्यग्रहणामुळे राज्यातील काही मंदिरं बंद करण्यात आली तर काही ठिकाणी दुरून दर्शन घेता येणार आहे. काही मंदिरात ग्रहण काळात भाविकांना दर्शनाला परवानगी नसणार आहे. आज संध्याकाळी 4.48 मिनिटांनी सूर्यग्रहण असणार आहे. हे ग्रहण 5.50 मिनिटांनी संपणार आहे.
शेगावचे संत गजानन महाराज मंदिर खुले, जाळीतून भक्तांना दर्शन घेता येणार
ग्रहणादरम्यान शेगावातील संत गजानन महाराजांचे मंदिर खुले असणार आहे. मात्र भाविकांना जाळीतूनच दर्शन घ्यावे लागणार आहे. आज सकाळी 3 वाजून 30 मिनिटांनी ग्रहणाचे वेध लागले असल्याने पहाटेची काकडा आरती झाली नाही व दुपारची पूजा , षोडशोपचार पूजा , माध्याणांची आरती होणार नसल्याच संत गजानन महाराज संस्थांनाच्या वतीने सांगण्यात आले आहे. दिवाळी नंतर सलग सुट्या असल्याने भाविकांची गर्दी लक्षात घेता मंदिरात मोठी उपाययोजना करण्यात आली आहे.
सिद्धिविनायक मंदिरात संध्याकाळी 4.30 ते 6.30 पर्यंत गाभाऱ्यात भाविकांना प्रवेश नाही
सिद्धिविनायक मंदिरात संध्याकाळी 4.30 ते संध्या. 6.30 पर्यंत गाभाऱ्यात भाविकांना प्रवेश नाही. यावेळेस सिद्धिविनायकाला जलाभिषेक करण्यात येणार आहे. मात्र, भाविकांना सिद्धिविनायकाचं बाहेरून दर्शन घेता येणार आहे.
संध्याकाळी ग्रहण समाप्तीनंतर 7 वाजल्यापासून दर्शन घेता येणार आहे.
साई मंदिराच्या दैनंदिन कार्यक्रमात बदल
खंडग्रास सूर्यग्रहणामुळे आजच्या दैनंदिन कार्यक्रमात बदल करण्यात आले आहे.दुपारी 4.40 मिनिटे ते सायंकाळी 6.31 मिनिटांपर्यंत साई समाधीचे दर्शन बंद राहणार आहे. दरम्यानच्या काळात साईबाबांच्या मूर्तीसमोर मंत्रोच्चार होणार आहे. समाधी मंदिराच्या सभा मंडपातून साईभक्तांना मूर्तीचे दर्शन घेता येणार आहे. सायंकाळी 7.15 वा. धुपारती पार पडेल.
त्यानंतर भाविकांच्या दर्शनरांगा पूर्ववत सुरू होणार आहे. साई संस्थानच्या मुख्यकार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी माहिती दिली आहे.
विठुरायाच्या दर्शन वेळेत बदल नाही
खंडग्रास सूर्यग्रहण काळात विठुरायाचे दर्शन घेता येणार आहे. भाविकांच्या दर्शनात मात्र कोणताही बदल केला नसल्याने देशभरात आलेल्या भाविकांना विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेता येणार आहे. मात्र विठुरायाच्या रोजच्या नित्योपचारात बदल करण्यात आला आहे.
पुणे दगडुशेठ मंदिर 4 ते 7 बंद
पुणे दगडुशेठ मंदिर 4 ते 7 बंद राहणार आहे. ग्रहण काळात कसबा मंदिर खुलं असेल मात्र गणपतीची मूर्ती झाकली जाणार आहे.
देहू आणि आळंदी दोन्ही मंदिर खुली राहणार आहेत.
अमरावती येथील अंबादेवी आणि एकविरा देवी मंदिर दर्शनासाठी बंद
अमरावती येथील अंबादेवी आणि एकविरा देवी मंदिर ग्रहणामुळे मूर्ती समोर पडदा लावण्यात आला आहे. आज दुपारी 12 वाजता पूर्ण बंद होईल सायंकाळी 6 वाजता भाविकांसाठी खुले राहणार आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या :