बार्शी-कुर्डुवाडी रस्त्यावर फिल्मीस्टाईल दरोडा, 9 प्रवासी वाहनं लुटली
एबीपी माझा वेब टीम | 30 Dec 2017 08:41 AM (IST)
प्रवाशांच्या अंगावरील दागिन्यांसह मोठ्या प्रमाणात रोकड पळवली.
सोलापूर : सोलापुरात शुक्रवारी रात्री दरोडेखोरांनी अक्षरशः हैदोस घातला. बार्शी-कुर्डुवाडी रस्त्यावर मध्यरात्रीनंतर जाणाऱ्या वाहनांना अडवून फिल्मीस्टाईल लूट केली. सशस्त्र दरोडेखोरांच्या टोळीने वाहनं थांबवून दहशत माजवली आणि एक-दोन नव्हे तर तब्बल नऊ प्रवासी वाहनं दरोडेखोरांनी लुटली. प्रवाशांच्या अंगावरील दागिन्यांसह मोठ्या प्रमाणात रोकड पळवली. इनोव्हा, स्कॉर्पिओ, अल्टो यासह खाजही ट्रॅव्हल कंपन्यांच्या दोन बसेसचा समावेश होता. दरोडेखोरांनी फक्त लूटमारच केली नाही तर लहान मुलं आणि महिलांनाही मारहाण केली. भयभीत झालेल्या प्रवाशांनी सकाळी कुर्डुवाडी पोलिस स्टेशन गाठलं आणि दरोडेखोरांविरोधात गुन्हा दाखल केला.