Solapur Nagar Panchayat Election Result : आज राज्यातील 105 नगरपंचायतींपैकी 93 नगरपंचायतीच्या 336 जागांसाठी काल निवडणूक प्रक्रिया पार पडली होती. आज या जागांचा निकाल लागला. सोलापूर जिल्ह्यात (Solapur panchayat Election Result) देखील वैराग (Vairag Nagar panchayat) माढा (Madha), माळशिरस, श्रीपूर, नातेपुते या नगरपंचायतीचा निकाल हाती आला आहे.  सोलापूर जिल्ह्यातील नगरपंचायत निवडणुकीत माळशिरस तालुक्यातील तीनही नगरपंचायत जिंकत मोहिते पाटील यांनी आपली ताकद पुन्हा दाखवून दिली आहे . माढा येथे मात्र पुन्हा दादासाहेब साठे यांनी निर्विवाद बहुमत मिळवत काँग्रेसचा झेंडा फडकावला आहे . तर वैरागमध्ये राष्ट्रवादीच्या निरंजन भूमकर यांनी आजी माजी आमदारांना धक्का देत सत्ता काबिज केली आहे. 


Nagar Panchayat Elections 2022 Result Live : नगरपंचायत, झेडपीचा रणसंग्राम; आज निकाल, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला


वैराग नगरपंचायतीत 17 पैकी 13 जागांवर राष्ट्रवादी


पहिल्यांदाच नगरपंचायत झालेल्या वैरागमध्ये 17 जांगापैकी 13 जागेवर राष्ट्रवादी तर 4 जागेवर भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. निरंजन भूमकर यांनी आजी आणि माजी आमदारांना धक्का देत वैराग नगरपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत आणि माजी मंत्री शिवसेनेचे दिलीप सोपल यांना राष्ट्रवादीच्या निरंजन भूमकरांनी धक्का दिला आहे. 


माळशिरस नगरपंचायत निवडणुकीत भाजपची सरशी
आज झालेल्या मतमोजणीमध्ये सर्वात जास्त चुरस माळशिरस नगरपंचायत निवडणुकीत दिसत होती , येथे मिलिंद कुलकर्णी आप्पासाहेब देशमुख यांच्या नेतृत्वाखाली 17 जागांवर भाजपने निवडणूक लढवली होती . त्यांना तुकाराम देशमुख यांनी राष्ट्रवादीकडून आव्हान देत रंगत आणली होती . याचवेळी माजी सरपंच माणिकबापू वाघमोडे यांनीही महाराष्ट्र विकास आघाडीचे पॅनल उभे करीत तिरंगी लढत निर्माण केली . मात्र आजच्या मतमोजणीत भाजपने १० जागा जिंकत माळशिरस नगरपंचायतीवर निर्विवाद बहुमत सिद्ध केले .  येथे राष्ट्रवादीचे आघाडी प्रमुख तुकाराम देशमुख यांचा विजय देशमुख नावाच्या भाजपच्या सध्या युवा कार्यकर्त्यांनी  पराभव केला . या निवडणुकीत मनसे तालुकाप्रमुख यांच्या पत्नी रेश्मा टेळे या महाराष्ट्र विकास आघाडीतून विजयी झाले .  या निवडणुकीत राष्ट्रवादीला केवळ २ जागांवर समाधान मानावे लागले तर माणिकबापू वाघमोडे यांच्या महाराष्ट्र विकास आघाडीला २ जागी विजय मिळविता आला . तीन जागांवर अपक्षांनी विजय मिळविला . मोहिते पाटील यांची प्रतिष्ठा आणि राष्ट्रवादीचे अस्तित्व पणाला लागलेल्या माळशिरस नगरपंचायत निवडणुकीत मोहिते पाटील यांनी आपली ताकद दाखवत पुन्हा माळशिरस तालुक्यावर आपली पकड मजबूत केली आहे . 

एकूण जागा - 17


भाजप -10


राष्ट्रवादी - 2


महाराष्ट्र विकास आघाडी  - 2


अपक्ष -1 ( बिनविरोध विजयी 


श्रीपूर महाळुंग नगरपंचायत 


श्रीपूर महाळुंग नगरपंचायत निवडणुकीत मोहिते पाटील यांच्या आघाड्यांच्या स्पष्ट बहुमत मिळविले असले तरी त्यांच्या तीन आघाड्या आणि भाजप हे एकमेकांच्या विरोधात लढल्याने  येथे राष्ट्रवादीला थेट फायदा होत ६ जागांवर विजय मिळविला आहे . श्रीपूर येथे आघाड्यांवर निवडणूक लढविण्यासाठी मोहिते पाटील समर्थक आग्रही असताना भाजपने येथे सर्व १७ जागांवर पक्षाचे उमेदवार उभे केल्याने मोठ्या प्रमाणात मतविभागणीचा फायदा राष्ट्रवादीला मिळाला . श्रीपूर मध्ये मोहिते पाटील गटाचे भीमराव रेडे आणि नाना मुंडफने यांच्या आघाड्या एकमेकांच्या विरोधात लढत होत्या . यात रामचंद्र सावंत या मोहिते गटातील एका नेत्याने येथेच ५ जागांवर उमेदवार दिले होते . आघाड्यांचे एकमत होत नसल्याने भाजपने येथे १७ जागी उमेदवार उभे केले तर राष्ट्रवादीनेही १७ जागांवर आपले उमेदवार दिले होते . केवळ १७ जगासाठी १०७ उमेदवार रिंगणात असल्याने निकालाची चुरस वाढली होती . आज लागलेल्या निकालात मोहिते पाटील यांच्या रेडे आणि मुंडफने या दोन आघाड्यांच्या ९ जागा जिंकत मोहिते गटाची सत्ता आणली असून येथे भाजपचा केवळ १ उमेदवार विजयी झाला आहे . राष्ट्रवादीने ६ जागा जिंकत आपली ताकद वाढवली आहे . शिवसेना आणि इतर पक्षांना एकही जागा जिंकता आलेली नाही . 


एकूण जागा -- १७ 


मोहिते पाटील भीमराव रेडे गट -- ५


मोहिते पाटील नाना फुंडफने गट -- ४ 


भाजप -- १


राष्ट्रवादी -- ६


काँग्रेस -- १ 
 
नातेपुते नगरपंचायत 


माळशिरस तालुक्यातील या तिसऱ्या नगरपंचायत निवडणुकीत मोहिते पाटील यांचेच दोन गट एकमेकांच्या विरोधात लढले होते . यात बाबाराजे देशमुख यांच्या जनशक्ती आघाडीने निर्विवाद बहुमत मिळवत नातेपुते नगरपंचायत ताब्यात घेतली आहे . त्यांना विरोध करणारे भानुदास राऊत हे देखील मोहिते पाटील गटाचे असून यांच्या नागरी विकास आघाडीला पराभवाचा धक्का बसला आहे . 


एकूण जागा -- १७ 


मोहिते पाटील , बाबाराजे देशमुख गट  - १२


मोहिते पाटील , भानुदास राऊत गट -- ५ 
 
माढा नगरपंचायत 


माढा नगरपंचायतीमध्ये पुन्हा एकदा काँग्रेसच्या  दादासाहेब साठे आणि मीनल साठे या दाम्पत्याने आपली सत्ता कायम ठेवत राष्ट्रवादी आणि शिवसेनेला धूळ चारली आहे . गेल्या नगरपंचायत निवडणुकीत दादा साठे हे भाजपमध्ये असतानाही त्यांचीच सत्ता माढा नागरपंचायतवर होती . यावेळी साठे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यावर देखील १७ पैकी १२ जागांवर विजय मिळवत त्यांनी आपली पकड अधिक मजबूत केली आहे . राष्ट्रवादीचे जेष्ठ आमदार बबनदादा शिंदे यांच्या गटाला दोन तर शिवसेनेचे शिवाजी सावंत गटाला केवळ २ जागांवर समाधान मानावे लागले आहे . एका ठिकाणी अपेक्षाच विजय झाला आहे . या नगरपंचायत निवडणुकीत सर्वात चुरशीची लढत माजी नगराध्यक्ष मीनल साठे आणि त्यांचे पुतणे शिवसेना शहर प्रमुख शंभू साठे यांच्यात झाली . मात्र मीनल साठे यांनी आपला पुतण्या शंभू साठे याचा दणदणीत पराभव करीत सहज विजय मिळविला . 


एकूण जागा -- १७ 


काँग्रेस - १२


राष्ट्रवादी -- २


शिवसेना  -- २ 


अपक्ष -- १


इतर महत्वाच्या बातम्या


Nanded Nagar Panchayat Election : नांदेड जिल्ह्यात काँग्रेसची बाजी, दोन नगरपंचायतींवर काँग्रेस तर एका ठिकाणी महाविकास आघाडीची सत्ता


Karjat Nagarpanchayat Election Result : कर्जत नगरपंचायतीवर रोहित पवारांची जादू! मिळवली एकहाती सत्ता, राष्ट्रवादी 12 जागांवर विजयी 


Kavathe mahankal result : निवडणुकीपूर्वी म्हणाले, माझा बाप नक्की आठवेल, आता रोहित पाटील म्हणतात, आबा मिस यू!