सोलापूर : पैशासाठी माणूस कधी काय करेल याचा अंदाज नाही. विवाहासारख्या नाजूक धाग्यांचा वापर करत एका भामट्याने तीन महिलांना विवाहबंधनात अडकवले. इतकं करुनसुद्धा त्याचा उद्देश साध्य न झाल्यामुळे चौथ्या लग्नाच्या तयारीत असलेल्या या भामट्याचं बिंग फुटलं. विशेष म्हणजे तिन्ही महिलांनी एकत्रित येऊन या भामट्याचा खरा चेहरा जगासमोर आणला आहे.
सोलापुरात एखाद्या चित्रपट किंवा नाटकाच्या कथानकाला शोभेल असा प्रकार घडला आहे. प्रकाश जगनगवळी या भामट्याने तीन महिलांशी विवाह केला आहे. तो चौथे लग्न करण्याच्या तयारीत असताना त्याच्या तीनही बायकांनी त्याचं बिंग फोडलं आणि पोलीस ठाण्यात तक्रारदेखील केली.
प्रकाश जगनगवळी या भामट्याने 2006 साली पहिला विवाह केला. लग्नानंतर रिक्षासाठी पैसे हवेत म्हणून बायकोशी अनेकदा भांडणही केलं. मारहाण करुन बायकोला घराबाहेर पडायला भाग पाडलं.
पहिली पत्नी निघून गेल्याची संधी साधत प्रकाश याने 2015 साली पुण्यातल्या दुसऱ्या मुलीसोबत संसार थाटला. तिला बीएसएनएलमध्ये क्लर्क असल्याचं सांगत गंडवलं. तिच्याकडून हुंडा घेतला आणि पुन्हा तिलाही त्रास द्यायला सुरुवात केली. ज्या संधीची वाट प्रकाश पाहत होता शेवटी तेच झालं. त्याची दुसरी पत्नी घर सोडून निघून गेली आणि प्रकाशने तिसरं लग्न थाटलं
तिसऱ्या पत्नीसोबतही त्याने तसाच व्यवहार केला. परिणामी तीदेखील घर सोडून निघून गेली. त्यानंतर त्याने चौथ्या लग्नाची तयारी सुरु केली. परंतु यावेळेस त्याचं भिंग फुटलं.
प्रकाशच्या तीनही बायकांना त्याची तीन लग्न झाल्याचे समजले. तसेच तो आता चौथं लग्न करत असल्याचेही कळले. त्यानंतर या तीन महिलांनी एकमेकांशी संपर्क साधला आणि थेट पोलीस ठाणे गाठले. या महिलांनी प्रकाश जगनगवळीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
सध्या या भामट्याचा पोलीस शोध घेत आहेत. तिन्ही महिलांनी एकत्र येऊन या भामट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केल्याने चौथ्या तरुणीचे आयुष्य वाचलं. मात्र हा भामटा असाच फरार राहील तोवर आणखी कुणी तरी फसलं जाण्याची शक्यता नाकरता येणार नाही. त्यामुळे अशा भामट्यांपासून सतर्क आणि सावधान राहण्याची आवश्यकता आहे.
सोलापुरात 'तीन बायका फजिती ऐका' प्रकाराने खळबळ, चौथ्या लग्नाच्या तयारीत असताना बिंग फुटलं
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
23 Jul 2019 12:02 AM (IST)
पैशासाठी माणूस कधी काय करेल याचा अंदाज नाही. विवाहासारख्या नाजूक धाग्यांचा वापर करत एका भामट्याने तीन महिलांना विवाहबंधनात अडकवले. इतकं करुनसुद्धा त्याचा उद्देश साध्य न झाल्यामुळे चौथ्या लग्नाच्या तयारीत असलेल्या या भामट्याचं बिंग फुटलं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -