1. फोनी वादळ बंगालच्या किनारपट्टीवर, ओदिशात 8 जणांचा बळी, कोट्यवधींच्या मालमत्तेचं नुकसान झाल्याची माहिती, जनजीवनही विस्कळीत

2. गडचिरोलीतील भूसुरुंग स्फोट प्रकरणी नक्षलींविरोधात गुन्हा, कंपनी चार टिपागड आणि कोरची दलमच्या नक्षलींविरोधात हत्या आणि देशद्रोहाचे गुन्हे

3. पंडित नेहरुंमुळेच भारताची गारुड्यांचा देश अशी प्रतिमा, प्रियांका गांधींच्या सापासोबतच्या व्हिडिओवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींची राजस्थानमधील सभेत टीका

4. लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील प्रचारतोफा आज थंडावणार, सात राज्यांतील 51 लोकसभा मतदारसंघांसाठी सोमवारी मतदान

5. निवडणूक आयोग जर थेट पंतप्रधानांना नोटीस बजावू शकतो, तर मनसेकडे सभांचा खर्च का नाही मागणार? सुनील तटकरेंकडून राज ठाकरेंची पाठराखण


6. निवडणूक आयोगाकडून सरकारला दुष्काळासंदर्भात काम करण्याची परवानगी, मात्र कामाचा प्रचार न करण्याचे सक्त आदेश

7. विनोद तावडेंच्या नावे बनावट ट्वीट व्हायरल, FYBcom ची परीक्षा वेळापत्रकानुसारच होणार, मुंबई विद्यापीठाचं स्पष्टीकरण

8. नालासोपाऱ्यात 12 तासात पाच मृतदेह आढळल्याने खळबळ, विनय कॉम्प्लेक्समध्ये तीन, तर नाल्यात बुडून दोन मजूरांचा मृत्यू

9. अॅमेझॉनचा समर सेल आजपासून, स्मार्टफोन्स, कपड्यांसह इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर मोठी सूट, 7 मेपर्यंत ऑफर

10. कोलकाता नाईट रायडर्सचा किंग्ज इलेव्हन पंजाबवर सात विकेट्सनी विजय, शुभमन गिलचं नाबाद अर्धशतक, कोलकाता पाचव्या स्थानावर