2. शरद पवार वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याच्या मुद्द्यावर चर्चा
3. विजयी सभेत बोलताना भाजपचे माढ्याचे खासदार रणजितसिंह निंबाळकरांची जीभ घसरली, रामराजेंच्या जन्मदात्यांवरुन खालच्या पातळीचं वक्तव्य
4. स्मृती इराणींचे निकटवर्तीय सुरेंद्र सिंह यांच्या पार्थिवाला स्वतः इराणींकडून खांदा, लोकसभेच्या निकालानंतर अमेठीत निर्घृण हत्या, कुटुंबियांचा काँग्रेस कार्यकर्त्यांवर संशय
5. नेत्यांच्या पुत्रप्रेमामुळे काँग्रेसची वाताहत, राहुल गांधींचा गहलोत, कमलनाथ आणि चिदंबरांकडे रोख, मुलांच्या तिकीटासाठी दबाव टाकल्याचा गौप्यस्फोट
6. राज्यात मान्सूनचं आगमन उशीरा होण्याची शक्यता, हवामान तज्ज्ञांचा अंदाज, उन्हाने वैतागलेल्या नागरिकांना दिलासा नाहीच
7. टिकटॉक व्हीडिओ तयार करण्यासाठी चक्क नागाचा किस, डोंबिवलीतल्या मुलांचा जीवघेणा खेळ, वनखात्याकडून दोघांना अटक
8. मुंबईतील कुर्ला स्टेशनजवळ लोकलच्या डब्याचं चाक घसरलं, संथ वेगामुळे मोठी दुर्घटना टळली, मात्र रात्री चार तास मध्य रेल्वेचा खोळंबा
9. मुंबईच्या धारावीतील इमारती आकर्षक चित्रांनी रंगल्या, परदेशी कलाकारांची मनमोहक ग्राफिटी, पेटींगच्या माध्यमातून सर्वसामान्य जीवनाचं चित्रण
10. पृथ्वी शॉच्या नॉर्थ मुंबई पँथर्सला मुंबई टी-20 लीगचं विजेतेपद, सोबो सुपरसॉनिक्सचा 12 धावांनी धुव्वा