लोकसभेच्या पहिल्या टप्प्यासाठी प्रचाराच्या तोफा थंडावल्या, उद्या मतदान, राजकीय दिग्गजांची अग्निपरीक्षा
नागपुरात मराठा समाजाचा नितीन गडकरींना पाठिंबा, सकल मराठा समाजाकडून पत्रक जारी
राहुल गांधी आज अमेठीतून अर्ज भरणार, काँग्रेसकडून शक्तिप्रदर्शनची तयारी, तर उद्या रायबरेलीतून सोनिया गांधी अर्ज दाखल करणार
छत्तीसगडच्या दंतेवाड्यात भाजप आमदारावर नक्षली हल्ला, आयईडी स्फोटात आमदाराचा मृत्यू, तर 5 जवान शहीद, दंतेवाड्यात उद्या मतदान
माओवाद्यांकडून निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा इशारा, गडचिरोली-चिमुर मतदार संघात अतिरिक्त पोलीस बल तैनात
वर्षभरात विठ्ठलाच्या चरणी 32 कोटींचं दान, गेल्या वर्षीच्या तुलनेत पाच कोटींची वाढ
मंजुळा शेट्ये हत्याप्रकरणी आरोपींची जामिनासाठी हायकोर्टात याचिका, 24 एप्रिलला सुनावणी
डोंबिवलीत पोलिसाच्या पत्नीची तोतया पोलिसाकडून फसवणूक, मानपाडा पोलिसांकडून आरोपीला बेड्या
राफेल प्रकरणात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, प्रशांत भूषण यांच्या पुनर्विचार याचिकेवर निर्णय येण्याची अपेक्षा