पंढरपूर : गरिबांचा देव म्हणून ख्याती असलेल्या विठुरायाच्या खजिन्यात चालू वर्षी 31 कोटी 90 लाखाचे उत्पन्न जमा झाले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या उत्पन्नात तब्बल 5 कोटी रुपयांची वाढ झाल्याचे समोर आले आहे. गेल्यावर्षी देवाच्या तिजोरीत 26 कोटी 56 लाखांचे उत्पन्न जमा झाले होते. समितीचा दैनंदिन खर्च वर्षाला 14 कोटी रुपये असून या वाढत्या उत्पन्नामुळे भाविकांना जास्तीच्या सुविधा देणे समितीला शक्य होणार आहे. तसेच विविध बँकांमध्ये समितीच्या 80 कोटी रुपयांच्या ठेवी असून याद्वारे समितीस 6 कोटी रुपयांहून अधिक व्याज प्राप्त होते, असेही त्यांनी सांगितले.


यंदा सर्वाधिक मदत ही हुंडीपेटीतून जमा झाली असून या माध्यमातून 5 कोटी 53 लाखांची रक्कम जमा झाली आहे. तर विठ्ठलाच्या चरणावर 3 कोटी 65 लाख रुपये आले आहेत.

यावर्षी विठुरायाला मिळालेले उत्पन्न
हुंडीपेटी – 5 कोटी 53 लाख
श्री विठ्ठल चरणावर – 3 कोटी 65 लाख
रुक्मिणी चरणावर- 1 कोटी 7 लाख
बुंदी लाडू – 3 कोटी 55 लाख
विविध देणग्या – 4 कोटी 83 लाख
परिवार देवता – 1 कोटी 28 लाख
नित्यपूजा – 1 कोटी 3 लाख
व्हिडीओकॉन – 40 लाख
चंदन उटी – 26 लाख
परदेशी चलन – 17 हजार

मंदिराचा खर्च  
कर्मचारी पगार – 3 कोटी 66लाख
लाडू – 3 कोटी 27 लाख
यात्रा – 1 कोटी 45 लाख
वीजबील – 67 लाख
केरळ पूरग्रस्त आणि शहीदांना मदत – 45 लाख
विविध दुरूस्ती – 36 लाख 45 हजार
गोशाळा- 34 लाख
अन्नछत्र – 28 लाख
मंदिरातील उत्सव – 23 लाख
वॉटर एटीएम – 21 लाख