रत्नागिरी : तालुक्यातील किंजळकर येथील दिशान नसीम ओंबीलकर या सहा वर्षांच्या मुलाच्या हाताचा तुटलेला पंजा शस्त्रक्रियेच्या माध्यमातून जोडण्याचे यशस्वी प्रयत्न शहरातील श्रध्दा मिल्टीस्पेशॉलीटी हॉस्पीटलच्या माध्यमातून नुकताच करण्यात आला आहे. हॉस्पिटलच्या मेडीकल टिमने साडेचार तास चाललेल्या शस्त्रक्रीया यशस्वीपणे पूर्ण केली. यामुळे हात पुन्हा जोडण्यात यश आलं असून शस्त्रक्रीयेमुळे जोडलेल्या हाताच्या बोटांचा रक्त पुरवठा सुरळीत झाला असून बोटांची हालचाल होण्यासाठी पुढील उपचार सुरु आहेत. त्यामुळे श्रध्दा हॉस्पिटलच्या सर्व डॉक्टरांचे पुर्ण तालुक्यातून कौतुक होत आहे.
किंजळघर येथील दिशान ओंबीलकर हा सहा वर्षांचा मुलगा मोठ्या भावा सोबत खेळण्यात दंग होता. भावासोबत खेळता खेळता त्याच्या हाताला फरशीचा घाव लागल्याने झालेल्या अपघातात दिशानच्या उजव्या हाताचा पंजा तुटला. केवळ करंगळी कडचा भाग मुळ शरिरास जोडलेला असल्याने त्याच अवस्थेत त्याला त्याचे कुटुंबियांनी मंडणगड येथील श्रध्दा हॉस्पिटलमध्ये पुढील उपचाराकरिता दाखल केले. हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी या प्रसगांचे गांर्भीय ओळखून हातवर तातडीने कराव्या लागणाऱ्या शस्त्रक्रीयेची माहिती पालकांना दिली.
पालकांनी मुलाचे पुढील उपचार करण्यासाठी डॉक्टरांना परवानगी दिली. यानंतर लगेचच या अवघड शस्त्रक्रीयेची हॉस्पिटलने तयार सुरु केली. यात बोटांची तुटलेली हाडं जोडणं, तुटलेल्या नसा जोडणं याचबरोबर त्वचा पुर्ववत करणं गरजेचं होतं यासाठी आवश्यक ती सर्व काळजी अग्रक्रमाने घेण्यात आली. तरीही या शस्त्रक्रीया यशस्वी होण्याची शक्यता फार कमी होती. मुलाचा बिन हाताचा भविष्यकाळ लक्षात घेता तो जोडून जितका पहिल्या सारखा करता येईल तितका करणे गरजेचे असल्याने प्रथम तुटेली बोटे प्रथम जुळवण्यात आली. यानंतर हाताच्या तळाकडील बाजूने शिरा जोडण्यात आल्या. त्यानंतर जोडलेल्या भागात रक्त पुरवठा होण्याचे आवाहन बाकी होते.
पहिल्या शस्त्रक्रीयेत तुटलेल्या भागात रक्त पुरवठा सुरु झाला आहे. त्यामुळे त्या भागात सेंसेशन आला आहे. याचबरोबर एका बाजूने बोटांची हालचाल सुरु झाली आहे. यासाठी आवश्यक असणारी यंत्रसामुग्री आणि औषधं रुग्णालयानं तातडीने उपलब्ध केली.
मंडणगड हा तालुका दुर्गम भागात असल्यानं अशा प्रकारची मोठी शस्त्रक्रीया करण्याची ही पहीलीच वेळ असून वैद्यकीय साधनसामुग्री आणि सोईसुविधाच्या अभावाच्या पार्श्वभूमीवर हॉस्पिटलेने केलेले ही शस्त्रक्रीया खुपच मोठे अचिव्हमेंट म्हणावी लागेल. श्रध्दा हॉस्पिटलमध्ये झालेल्या शस्त्रक्रीया यशस्वी करण्यासाठी डॉ. प्रसाद आंबेकर, डॉ. रोशन उत्तेकर, डॉ. प्रसाद टिळक, डॉ. अमृतराज वडजकर, डॉ. विजय पेटकर, डॉ. अनिल काकडे, डॉ. ज्योती लोखंडे-वडजकर, व्यवस्थापक नारायण कुलकर्णी आणि सर्व स्टाफने मेहनत घेतली.
दिशानवर करण्यात आलेल्या शस्त्रक्रियेसंदर्भात माहिती देताना अस्थिरोग तज्ञ डॉ. रोशन उत्तेकर यांनी सांगितलं की, "मुलाच्या हातावर अवघड असणारी गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. हात वाचवण्याला प्राधान्य देत पंजा जोडण्यात आला. पहिल्या स्टेपमध्ये तळव्याकडील भाग जोडण्यात आला असून दुसऱ्या स्टेपमध्ये वरच्या भागावर शस्त्रक्रिया करण्यात येईल. रक्तपुरवठा सुरळीत होण्याच्या दृष्टीने सतर्कतेने निरीक्षण आणि ड्रेसिंग सुरु आहे." तसेच या शस्त्रक्रियेसंदर्भात बोलताना दिशानचे पालक नसीम ओंबीलकर म्हणाले की, "श्रद्धा हॉस्पिटल सर्वसामान्य रुग्णांसाठी आश्वासक बनले आहे. एवढी मोठी शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र अद्याप बिलाची मागणी न करता उलट आम्हालाच धीर देण्याचे काम श्रद्धा हॉस्पिटल करीत आहे."