रत्नगिरी : मे महिन्याच्या सुरूवातीला कोरोनामुक्तीकडे वाटचाल करणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना रूग्णांची संख्या आता 556 वर पोहोचली आहे. आजघडीला जिल्ह्यात कोरोनावर उपचार घेणाऱ्यांची संख्या ही 109 असून 424 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर आतापर्यंत 24 जणांना कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्याच्या घडीला जिल्ह्यात कोरोनावर मात करणाऱ्यांचे प्रमाण हे 70 टक्क्यांपेक्षा देखील जास्त आहे. पण, अशावेळी जिल्ह्याच्या चितेत भर पडली आहे. कारण, जिल्हा रूग्णालयात प्रसुतीसाठी दाखल केलेल्या सहा मातांना कोरोनाची लागण झाली आहे. शिवाय, यात वॉर्डमध्ये काम करणाऱ्या एका परिचारिकेला देखील कोरोनाची बाधा झाली आहे. तर, 14 मातांना क्वॉरंटाईन करून ठेवत त्यांचे आणि बालकांचे देखील स्वॅब तपासणीकरता घेण्यात आले आहेत. त्यामुळे आता या मातांचे आणि बालकांचे रिपोर्ट काय येतात? याकडे सर्वाचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान, कोरोनाच्या या काळात रत्नागिरी जिल्हा रूग्णालय हो कोरोना रूग्णालय करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पण, प्रसुती वॉर्डमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्यामुळे आता आरोग्य यंत्रणा देखील सतर्क झाली आहे.


रत्नागिरी जिल्हा रूग्णालयामध्ये जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यामधून हजारोंच्या संख्येने रूग्ण येत असतात. त्यामुळे जिल्हा रूग्णालय कोरोना रूग्ण करण्याचा निर्णय घेतल्यानंतर बाह्य रूग्ण विभागासह इतर काही विभाग हे शहरातील इतर ठिकाणी हलवण्यात आले आहेत. काही वेळेला रूग्णाला खासगी रूग्णालयात देखील भरती केले जात आहे. पण, प्रसुती विभागासह इतर काही विभाग हे जिल्हा रूग्णालयामध्ये आहेत.


कुठे होते कोरोना टेस्ट?


सुरूवातीच्या काळात जिल्ह्यातील कोरोना रिपोर्ट हे मिरज किंवा पुणे येथे पाठवले जात होते. पण आता जिल्हा रूग्णालयामध्ये कोरोना विषाणू चाचणी प्रयोगशाळा उभारली गेली असून दररोज जवळपास 250 स्वॅब या ठिकाणी तपासले जातात. काही दिवसांनंतर हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. पण, रिपोर्टसाठी परजिल्ह्यावर असलेले रत्नागिरी जिल्ह्याचे अवलंबित्व आता संपले आहे. जिल्ह्याचा विचार करता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्वरीत या कोरोना लॅब उभारणीला मंजुरी दिली. त्यानंतर आता जिल्हा रूग्णालयामध्ये कोरोना संशयितांची तपासणी केली जात आहे.


Distance Alert जवळ कुणी आल्यास 'मेंटेन सोशल डिस्टन्स' यंत्र अलार्म वाजवणार,मंगेश ठोकळकडून इन्व्हेंशन