Nagpur News नागपूर : उद्धव ठाकरे, अजित पवार आणि इतर नेत्यांवर खोटे आरोप करावेत यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनिल देशमुखांवर (Anil Deshmukh) दबाव आणल्याचा आरोप अनिसचे प्रमुख श्याम मानव (Shyam Manav) यांनी केला होता. त्यावर फडणवीसांनी  (Devendra Fadnavis) प्रत्युत्तर देत श्याम मानव (Shyam Manav) हे देखील काही सुपारीबाजाप्रमाणे सुपारी घेऊन आपल्यावर असे आरोप करत आहेत का, हे पाहावं लागेल असं प्रत्युत्तर दिले होते. आता याच मुद्दावरुन श्याम मानव (Shyam Manav) यांनी पुन्हा देवेंद्र फडणवीसांच्या टीकेवर पलटवार केला आहे.


मला कोण विकत घेऊ शकतो का?


माझ्या अनुभवानुसार एखाद्या व्यक्तीने कुठली गोष्ट सांगितली, तर कुठले पुरावे पहावे, त्यावर किती विश्वास ठेवावा, हे मला माहित आहे. मी खोटं बोलत नाही. तसेच हे मी पहिल्यांदा बोललो नाही. लोकसभा निवडणुकीच्या काळात हे मी 34 सभेत बोलत आहे. त्यामुळे मला कोणीतरी सुपारी दिली आणि त्यानंतर मी असे  बोलेले, असं देवेंद्र फडणवीस यांना म्हणायचं आहे का? मला कोण विकत घेऊ शकतो का? किंबहुना विकत घेण्याची क्षमता ही देवेंद्र फडणवीस यांच्यामध्येच चांगली असल्याची बोचरी टीका श्याम मानव (Shyam Manav) यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांवर केली आहे.


मी जे बोललो त्यावर आजही ठाम आहे - श्याम मानव 


इमर्जन्सीमध्ये इंदिरा गांधींचा विरोध केला असताना संघाचे लोक तसेच देवेंद्र फडणवीस यांचे वडील गंगाधर फडणवीस यांच्या सोबतही मी काम केलं आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या बद्दल मी विचार करून बोललो. जे बोललो त्यावर मी ठाम आहे. मी गेल्या लोकसभेत जनजागृती केलीय, आता विधानसभेत ही जनजागृती करणार असल्याचे श्याम मानव  म्हणाले. तर या प्रकरणी श्याम मानव यांनी असे वक्तव्य करण्यापूर्वी मला संपर्क करायला हवा होता, असे बोलताना आज देवेंद्र फडणवीस  म्हणाले आहे.


त्यावर प्रतिक्रिया देताना श्याम मानव  म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांना भेटणं एवढं सोपं आहे का? देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी मी मागील तीन वर्षे मला तासंतास वाट पाहावी लागली असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.मला राजकारणात पडायचे नाही. ठाम विश्वास असल्यानेच मी हे बोललो. अनिल देशमुख यांच्याकडे असलेल्या पुराव्याबद्दल खात्री असल्यानं मी बोललो आहे. सरकारवर गंभीर आरोप करताना खात्री पटल्यानं मी बोललो.असल्याचेही  श्याम मानव म्हणले. 


ही बातमी वाचा: