Ganjanan Maharaj  : आज शेगावच्या संत गजानन महाराजांचा 144 वा प्रकट दिन आहे. आजच्याच दिवशी म्हणजे 23 फेब्रुवारी 1878 साली संत गजानन महाराज शेगावात प्रकट झाले होते. कोरोनाच्या निर्बंधात सलग तिसऱ्या वर्षीही हा उत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. मंदिर प्रशासनाने भाविकांना ऑनलाईन पासद्वारे दर्शन घेण्याची सुविधा दिली असली तरी राज्यभरातून जवळपास 150 दिंड्यांनी शेगावात हजेरी लावली. गजानन महाराजांच्या दर्शनासाठी सकाळी 5 वाजल्यापासूनच भक्तांनी मंदिर परिसरात गर्दी केली. काळापासूनच शेगावात भक्तांची मांदियाळी बघायला मिळत असून भक्तांमध्ये मोठा उत्साह बघायला मिळतो. 


खरंतर, गजानन महाराजांचा प्रकट दिन उत्सव दरवर्षी श्री संस्थानमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांसह लाखो भाविक भक्तांच्या आणि  वारकऱ्यांचे उपस्थितीत मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. पण मागील दोन वर्षांपासून बंद असलेली धार्मिक स्थळे बंद ठेवण्यात आली होती. यंदाही हा उत्सव अत्यंत साधेपणाने साजरा होणार आहे. उत्सवातील कार्यक्रम धार्मिक प्रथा-परंपरेनुसार मोजक्या उपस्थितीत अंतर्गतच संपन्न होणार आहेत. अशी माहिती श्री गजानन महाराज संस्थानकडून देण्यात आली आहे.


शेगावात महाराजांनी आपले जीवन शेगाववासीयांच्या सहवासात घालविले. दरम्यान, त्यांनी मोठा भाविक वर्ग निर्माण केला होता आणि येथेच ते समाधिस्त झाले. दरवर्षी टाळ मृदुंगाच्या गजरात 'गण गण गणात बोते'चे नामस्मरण करत श्री गजानन या सोहळ्यासाठी हजारो पायी दिंड्या-पालख्या शेगावात दाखल होत असतात. शेगाव संस्थानच्या वतीने या सर्व दिंडी आणि पालख्यांसाठी विविध सोई-सुविधादेखील पुरवल्या जातात. राज्यभरातून हजारो भाविक या प्रकक दिन सोहळ्यासाठी शेगाव येथे महाराजांचे दर्शन घेण्यासाठी येतात. परंतु, हा सोहळा देखील कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे मोजक्या लोकांच्या उपस्थितीत अत्यंत साधेपणाने साजरा केला जात आहे. 


संबंधित बातम्या :


Important Days in February 2022 : फेब्रुवारी महिना दिनविशेष, जाणून घ्या महत्वाचे दिवस कोणते आहेत?


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha