Jayant patil on Nawab malik ED Inquiry : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीच्या अधिकाऱ्यांनी चौकशीसाठी कर्यालयात नेले आहे. आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास नवाब मलिक यांनी ईडी कार्यालयात नेण्यात आले आहे. यावर विविध रजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहे. केंद्र सरकार विरोधात जाहीरपणे बोलणाऱ्यांवर यंत्रणांचा गैरवापर करुन कारवाई केली जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीदेखील प्रतिक्रिया दिली आहे. हा आणखी एक सत्तेच्या दुरुपयोगाचा प्रकार आहे. कोणतीही नोटीस न देता राज्यातील एका मंत्र्यांना घेऊन जाणे ही सर्वच गोष्टीची पायमल्ली आहे. हे वर्तन देशाच्या संघराज्य व्यवस्थेच्या विरोधातील असल्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील म्हणाले.
अलीकडच्या काळात नवाब मलिक यांनी अनेक प्रकरणे बाहेर काढली होती. त्याची प्रतिक्रिया म्हणून कदाचित जाणीवपूर्वक अडचणीत आणण्याचे काम केले जात आहे. वेळोवेळी त्यावर आवाज उठवला होता, म्हणून कदाचीत नवाब मलिक यांना अडचणीत आणण्याचे काम असेल, असेही जयंत पाटील यावेळी म्हणाले. जाणीवपूर्वक नवाब मलिक यांच्यावर राग काढण्याचं काम सुरू झालं आहे, असे जयंत पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.
राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने चौकशीसाठी अधिकाऱ्यांनी नेले आहे. आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास नवाब मलिक यांनी ईडी कार्यालयात नेण्यात आले आहे. जवळपास 4 तास झाले नवाब मलिक यांची ईडीच्या कार्यालयात चौकशी सुरू आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याची संपत्ती खरेदी केल्याप्रकरणात ईडी आणि इतर तपास यंत्रणांकडून कारवाई सुरू आहे. राज्याचे मंत्री नवाब मलिक यांना चौकशीसाठी ईडीने समन्स पाठवले होते. ईडी अधिकाऱ्यांचे एक पथक आज सकाळी पाच वाजताच नवाब मलिक यांच्या निवासस्थानी दाखल झाले. त्यानंतर जवळपास दोन तास चर्चा सुरू होती. त्यानंतर सकाळी सात वाजता नवाब मलिक यांनी स्वत: हून ईडी कार्यालयात चौकशीसाठी येत असल्याचे सांगितले आणि त्यानंतर ते ईडी अधिकाऱ्यांसोबत कार्यालयात दाखल झाले आहेत.
प्रकरण काय?
मुंबईत आणि लगतच्या परिसरात ईडीनं काही दिवसांपूर्वी छापेमारी केली होती. ईडीच्या रडारवर डॉन दाऊद इब्राहीमची मुंबईतली मालमत्ता आणि त्या संपत्तीशी निगडीत व्यवहार करणारे काही नेतेमंडळी ईडीच्या रडारवर होते. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आदेशानंतर ईडीने ही कारवाई सुरू केली. या छापेमारीनंतर काही नेते अडचणीत येऊ शकतात याची दबक्या आवाजात चर्चा सुरु होती.
दरम्यान, या प्रकरणावरुन राष्ट्रवादी काँग्रेस चांगलीच आक्रम झाल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते ईडीच्या कार्यालयाबाहेर जमणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आत आणखी संघर्ष पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.