मुंबई : TRP प्रकरणी आरोपी असलेल्या संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेची मागणी काँग्रेसने केली आहे. अर्णब गोस्वामी यांच्या चॅटमधील अतिशय गोपनीय माहिती समोर आली आणि काँग्रेस शिष्ठमंडळाने आज गृहमंत्र्यांनी भेट घेऊन अटकेची मागणी केली आहे.
लोकसभा निवडणुकीआधी 40 जवान शहीद झाले. त्यानंतर भारताने पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक केला. पाकिस्तानवरील हल्ल्याबाबत उल्लेख तीन दिवस आधी संपादक अर्णब गोस्वामी यांच्या चॅटमध्ये आढळून आला आहे. टीआरपी घोटाळा प्रकरणी मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या चार्जशीटमध्ये हे चॅट आहे. या प्रकरणी कॉंग्रेस पक्षाचे सचिन सावंत यांनी गोस्वामी यांच्या अटकेची मागणी केली.
सैन्याची कारवाई किंवा करणारा हल्ला या गोपनीय बाबी आहेत त्या एखाद्या संपादकाला कशा माहिती? हा official secret act चा भंग असल्याचा आरोप भाजपने केला. याबाबत कायदेशीर माहिती घेऊन कारवाई करू असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सूचित केले आहे.
अनव्य नाईक प्रकरणी याआधी अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यात आली होती. टीआरपी घोटाळ्यात त्यांचे जे चॅटस् समोर आले ते आता संपादक गोस्वामी यांना अडचणीत टाकणारे आहेत. या प्रकरणी चौकशी व्हावी पण तस होणार नाही असं राहुल गांधी यांनी देखील आज वक्तव्य केले आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार तरी कारवाई करणार का हे लवकर स्पष्ट होईल.
संबंधित बातम्या :
लष्कराची गुपितं बाहेर कशी येतात? अर्णब गोस्वामी यांच्या व्हायरल चॅटसंदर्भात खासदार संजय राऊत यांचा सवाल
Arnab Goswami Whatsapp Chats | अर्णब गोस्वामी यांच्या व्हाट्सअॅप चॅटबाबत चौकशी होणार : अनिल देशमुख